शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

मुस्लीम महिलेने आॅटो चालवून रोजगाराचा घेतला निर्धार

By admin | Updated: January 4, 2016 00:03 IST

घरची परिस्थिती बेताचीच. मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे, हे फार पूर्वीपासून स्वप्न उराशी बाळगून होते.

जिल्ह्यात पहिला उपक्रम : सावित्रीच्या लेकीने पुरुषाची मक्तेदारी मोडली श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराघरची परिस्थिती बेताचीच. मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे, हे फार पूर्वीपासून स्वप्न उराशी बाळगून होते. मात्र महिलांना धुणी-भांडी करूनच रोजगार मिळविण्याचा शिरस्ता. वेगळे काही करण्याची मनाशी जिद्द होतीच. सावित्रीबाई फुलेंनी महिलांना जो सन्मान दिला तो कायम ठेवत त्यांच्या जयंतीदिनी एका मुस्लीम महिलेने रोजगारासाठी चक्क आॅटो चालविण्याचा निर्धार घेतला. शबाना परवीन अब्दुल जलील, असे या महिलेचे नाव आहे. शबाना परवीन या बडनेरा येथील नवीवस्तीच्या मिलचाळ परिसरातील झोपडपट्टीत राहतात. पती अब्दुल जलील हे मोलमजुरीचे काम करतात. रात्रीला सिक्युरिटीचेसुद्धा काम करून ते संसाराचा गाडा हाकतात. मात्र दोन मुले, एक मुलगी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या पतीच्या कमाईतून ते शक्य होत नव्हते. म्हणून यांनी हे धाडस केले. मुमताज नावाची मुलगी ही बी.ए. च्या प्रथम वर्षाला शिकत आहे. तर इयत्ता दहावी व सातवीत मुले शिक्षण घेत आहेत. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण झाले असताना मुला- बाळांना चांगल्या दर्जाचे शिक्षण कसे बरे मिळेल, या विवंचनेत शबाना परवीन सतत असायच्या. परिणामी पतीला काहीतरी हातभार लावता यावा, यासाठी अंगी वाहन चालविण्याचा असलेला गुण सार्थकी लावण्याचे ठरविले. पतीच्या होकारानंतर आॅटो चालवून रोजगार मिळविण्याचा मानस धरला. आॅटो चालविण्याचा परवाना, बॅच, बिल्ला काढण्यासाठी आधारवड फाऊंडेशनची भरीव मदत मिळाली. आधारवडचा मिळाला आधारबडनेरा : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात येणाऱ्या अडचणी आधारवड फाऊंडेशनचे विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड यांनी सोडविल्या. रविवारी बडनेरा पोलीस ठाण्यात सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शबाना परवीन यांच्या आॅटोरिक्षा चालविण्याला सहायक पोलीस निरीक्षक मेहत्रे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. एका मुस्लिम महिलेने रोजगासाठी आॅटोरिक्षा हाती घेतल्याची पहिली घटना म्हणून जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. यावेळी विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बडनेरा- अमरावती मार्गावर आॅटोरिक्षा चालवून त्यांनी ‘ट्रॉयल’ घेतलीे. आॅटोरिक्षा हा भाड्याने घेऊन चालविणार असल्याचे शबाना परवीन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. लहानशा भांडवलातून रोजगार मिळविण्यासाठी आॅटोरिक्षा चालविणे हे सोयीचे आहे. सन्मानाने जगण्याची जिद्द असल्यामुळे पुरुषांची मक्तेदारी असलेला आॅटो रिक्षा व्यवसाय सुरु केला. तेही सावित्रीबार्इंच्या जन्मदिनापासून प्रारंभ करण्याचा वेगळा आनंद मिळाला.- शबाना परवीन अब्दुल जलील, महिला आॅटो चालक, बडनेरा