मुस्लिम समाजाला हवे दहा टक्के आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST2021-06-28T04:10:16+5:302021-06-28T04:10:16+5:30
वनोजा बाग : मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे यासाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर मोईन मोहंमद यांच्या ...

मुस्लिम समाजाला हवे दहा टक्के आरक्षण
वनोजा बाग : मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे यासाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर मोईन मोहंमद यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते
मुस्लिम समाजाची मागणी आहे की समाजाचा सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे वचन दिले होते ते पूर्ण करून मुस्लीम समाजाला दहा टक्के आरक्षण लागू करावे त्यामुळे समाजातील बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील त्यासाठी शुक्रवारी (ता.२५) दुपारी दोन वाजता येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्या गेले आंदोलन प्रमुख मोईन मोहंमद यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी १४ डिसेंबर २०२० ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री नबाब मलिक याना निवेदन दिले होते त्यानंतर २१ जून २०२१ ला तहसीलदारांमार्फत लेखी निवेदन पाठवले होते त्यात आजच्या आंदोलनांचा इशारा दिला होता परंतु शासनाच्या वतीने कुठलीही पावलं उचलल्या गेली नाहीत त्यामुळे हे आंदोलन केल्या गेले मुस्लिम समाजातील मोईन मोहंमद,डॉ अब्दुल राजिक, मास्टर नाझिम, अर्शद खान, तवाफ भाई,राजू कुरेशी,कलीम भाई इरफान शहा, विनीत डोंगरदिवे, शेख रहीम,जावेद खान,शफी नियाजी .फहिमभाई. सोयल. आमीन भाई, सलीम भाई ,हरून मेंबर शंकर मालठाने आणि मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते