मध्यवर्ती कारागृहात संगीतमय होळी
By Admin | Updated: March 13, 2017 00:14 IST2017-03-13T00:14:45+5:302017-03-13T00:14:45+5:30
मध्यवर्ती कारागृहात रविवारी संगीतमय कार्यक्रमाच्या मेजवानीत होळी साजरी करण्यात आली.

मध्यवर्ती कारागृहात संगीतमय होळी
पुढाकार : नैसर्गिक रंगातून धुळीवंदनाचा संकल्प
अमरावती : मध्यवर्ती कारागृहात रविवारी संगीतमय कार्यक्रमाच्या मेजवानीत होळी साजरी करण्यात आली. कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला असून या कार्यक्रमात कैद्यांनी नैसर्गिक रंगाचा वापर करून धुळीवंदन खेळण्याचा संकल्प केला.
आय फाऊडेशन यांच्याकडून मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी होळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमात एक हजारावर कैद्यांनी सहभाग घेऊन एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दर्यापूर येथील जे. डी. पाटील महाविद्यालय यांच्यावतीने कैद्यांसाठी संगितमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या संगीतमय कार्यक्रमाने कैदी मंत्रमुग्ध झाले. यावेळी आय फाऊंडेशनच्या माधुरी देशपांडे व अधीक्षक भाईदास ढोले यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)