हमालपुरा येथे तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:10 IST2021-07-02T04:10:36+5:302021-07-02T04:10:36+5:30

अमरावती : जुन्या वैमनस्यातून हमालपुरा भागात ३२ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात ...

Murder of a youth at Hamalpura | हमालपुरा येथे तरुणाचा खून

हमालपुरा येथे तरुणाचा खून

अमरावती : जुन्या वैमनस्यातून हमालपुरा भागात ३२ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आकाश वलन (३२, रा. आदिवासी कॉलनी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद वाडेकर (२८, रा. आदिवासी कॉलनी) याला अटक करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आकाशवर खुनी हल्ला चढविण्यात आला.

पोलीस सूत्रानसार, एकाच भागात राहणाऱ्या आकाश व प्रमोद यांच्यात जुने वैमनस्य होते. त्यातून गुरुवारी सायंकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास हमालपुरास्थित हनुमान मंदिराजवळ दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन आरोपी प्रमोदने आकाशवर चाकूने वार केले व तेथून पळ काढला. काही प्रत्यक्षदर्शीनी त्याला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तेथे रात्री १० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Web Title: Murder of a youth at Hamalpura