जुन्या वैमनस्यातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:53+5:302021-07-07T04:15:53+5:30
अमरावती : जुन्या वैमनस्यातून १९ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. लुंबिनीनगर भागात मंगळवारी दुपारी ४.४५ च्या सुमारास ...

जुन्या वैमनस्यातून तरुणाचा खून
अमरावती : जुन्या वैमनस्यातून १९ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. लुंबिनीनगर भागात मंगळवारी दुपारी ४.४५ च्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ऋत्विक निळकंठ बेलेकर (१९, रा. लुंबिनीनगर) असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, एकूण सहा जण दुपारच्या सुमारास ऋत्विकच्या घरात शिरले. त्याला बाहेर बोलावून सहापैकी तिघांनी त्याच्या छातीवर चाकूने वार केलेे. त्याला रक्तबंबाळ स्थितीत टाकून तीनही आरोपींनी तेथून पळ काढला. दरम्यान, काही शेजारी व प्रत्यक्षदर्शींनी ऋत्विकला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हमालपुरा येथे झालेल्या खुनाची घटना ताजी असताना, आजच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत पंचनामा केला तथा आरोपींची धरपकड सुरू केली.