सबलीने वार करून इसमाची हत्या

By Admin | Updated: January 14, 2017 00:11 IST2017-01-14T00:11:55+5:302017-01-14T00:11:55+5:30

गावातील व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी गाव स्मशानभूमित गोळा झाला असताना गावकऱ्यांसमक्षच सबलीने डोक्यात वार करून ४० वर्षीय इसमाला ठार केल्याची घटना ...

The murder of the victim by a sub-division | सबलीने वार करून इसमाची हत्या

सबलीने वार करून इसमाची हत्या

धामणगाव काटपूर येथील घटना : स्मशानभूमित गावकऱ्यांसमक्षच थरार
लेहगाव : गावातील व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी गाव स्मशानभूमित गोळा झाला असताना गावकऱ्यांसमक्षच सबलीने डोक्यात वार करून ४० वर्षीय इसमाला ठार केल्याची घटना गुरूवारी नजीकच्या धामणगाव काटपूर येथे घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इसमाचा नागपूर येथे उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता पोेलिसांनी वर्तविली आहे.
दिलीप देवीदास निमकर्डे (४०, रा. धामणगाव काटपूर) असे मृताचे तर सबलीने वार करून ठार मारणाऱ्या आरोपीचे नाव संदीप मुकुंद तायडे, असे आहे.
विस्तृत माहितीनुसार, गावातील गरिब्या ऊर्फ देवीदास अढाईके नामक वृद्धाचा मृत्यू झाल्याने त्याची अंत्ययात्रा गावातील स्मशानभूमित गेली होती. अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्याचे काम संदीप मुकुंद तायडे हा करीत होता.
अंत्ययात्रेत १०० ते १५० गावकरी सहभागी झाले होते. त्यातच दिलीप देवीदास निमकर्डे हेदेखील उपस्थित होते. खड्डा खोदत असतानाच आकस्मिकपणे आरोपी संदीप तायडे याने खड्डा खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सबलीने दिलीप निमकर्डे याच्या डोक्यावर मागून वार केले. यात ते गंभीर जखमी झाले.
नातलगांनी तातडीने त्यांना आधी जिल्हा सामान्य रूग्णालयात व प्रकृती गंभीर असल्याने नागपूरच्या रूग्णालयात हलविले. मात्र शुक्रवारी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, आरोपी तेथून पसार झाला होता. त्याने गुरूवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा तपास शिरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चव्हाण, बीट जमादार घोम यांच्या मार्गदर्र्शनात सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: The murder of the victim by a sub-division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.