ब्राह्मणवाडा थडी येथे वृद्धेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:10+5:302021-07-09T04:10:10+5:30
ब्राम्हणवाडा थडी : स्थानिक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धेचा गळ्यावर चाकूने वार करीत खून करण्यात आला. ...

ब्राह्मणवाडा थडी येथे वृद्धेचा खून
ब्राम्हणवाडा थडी : स्थानिक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धेचा गळ्यावर चाकूने वार करीत खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी ९ ते १० च्या सुमारास ही घटना उघड झाली. गिरजा अण्णाजी अमझरे असे मृत महिलेचे नाव आहे.
चार मुलांपासून वेगळे स्वतंत्र घरात पतीसह राहणाऱ्या गिरजाबाईंचा खून करून अज्ञात मारेकरी त्यांच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाची सोन्याची पोत घेऊन पसार झाला. त्यांचे पती अण्णाजी हे सकाळी ९ च्या सुमारास काही निमित्त बाहेर गेले होते. सकाळी १०.१० च्या सुमारास घरी परत आले असता त्यांना पत्नी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. त्यांच्या शेजाऱ्यांनी ही माहिती तातडीने स्थानिक पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच ठाणेदार दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय शिंदे, साहेबराव राजस, किसन सपाटे, महेंद्र राऊत, खेडकर, वानखडे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.