प्रदीप भाकरे
अमरावती: शहरालगतच्या भानखेडा फाटा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला आणि तिच्या मित्राला गाठून पाच नराधमांनी हैवानियत दाखवली. मित्राला बेदम मारहाण करून बांधले आणि तरुणीवर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे, या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओही चित्रित केला. मात्र, अमरावती पोलिसांनी ‘सिंघम’स्टाईलने चक्रे फिरवत अवघ्या १२ तासांत पाचही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. २८ मार्चच्या रात्री ८ वाजता पीडिता मित्रासोबत मोपेडने परतत असताना अज्ञात नराधमांनी त्यांना अडवले. बळजबरीने जंगलात फरफटत नेत आरोपींनी पैशांसाठी मित्राला रक्तबंबाळ केले. पीडितेने जवळ असलेले पैसे देऊनही एका नराधमाने अत्याचार केला, तर इतरांनी त्याला साथ दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी रात्रभर जंगल पिंजून काढले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सामूहिक बलात्कार आणि लुटीचा गुन्हा दाखल असून, पीडितेची ओळख उघड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिला आहे.
Web Summary : In Amravati, a college student was brutally assaulted and gang-raped in Bhan Kheda forest. Police swiftly arrested all five perpetrators within 12 hours, showcasing a 'Singham' style operation. A case of gang rape and robbery has been registered.
Web Summary : अमरावती में, भानखेड़ा जंगल में एक कॉलेज छात्रा पर क्रूरतापूर्वक हमला किया गया और सामूहिक बलात्कार किया गया। पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए 12 घंटे के भीतर सभी पांच अपराधियों को गिरफ्तार कर लिया। सामूहिक बलात्कार और लूट का मामला दर्ज किया गया है।