परतवाड्यात नगरपालिका सफाई कर्मचाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST2021-05-05T04:20:31+5:302021-05-05T04:20:31+5:30

परतवाडा : अचलपुर नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने गळ्यासह ,पोटावर,मांडीवर सपासप वार करून सोमवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान ...

Murder of municipal cleaner in return | परतवाड्यात नगरपालिका सफाई कर्मचाऱ्याची हत्या

परतवाड्यात नगरपालिका सफाई कर्मचाऱ्याची हत्या

परतवाडा : अचलपुर नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने गळ्यासह ,पोटावर,मांडीवर सपासप वार करून सोमवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान हत्या करण्यात आली जुन्या वैमनस्यातून छोटा बाजार परिसरात हत्या करण्यात आली या घटनेने शहरात खळबळ उडाली असून सर्वत्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे नजीकच्या पोलिस स्टेशन मधील अतिरिक्त पोलिस कुमक व दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आली आहे घटनेसदर्भात आरोपीचा शोध व गुन्हा दाखल करण्याची कारवाई परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती

विकी देविदास पवार २८ रा रविनगर परतवाडा असे मृताचे नाव आहे तर( मुराद खान इस्माईल खान ....).रा छोटा बाजार परतवाडा असे संशयित आरोपीचे नाव पुढे आले आहे. मृतक विकी पवार अचलपुर नगरपालिकेत मागील दहा वर्षापासून सफाई कर्मचारी पदावर कार्यरत होता तो विवाहित असून त्याला दोन मुल आहेत सोमवारी दुपारी चार वाजता च्या दरम्यान एम एच २७ बी एम ६३३० क्रमांकच दुचाकीने छोटा बाजारात परिसरातून जात असताना हल्लेखोरांनी विकी हल्ला चढवीत गळ्यावर पोटावर मांडीवर धारदार शस्त्राने वार केले त्यात तो गंभीर जखमी झाला व जीव वाचवीत दुचाकी ने काही अंतरावर जाऊन खाली कोसळला घटनेची माहिती मिळताच परतवाडा चे ठाणेदार सदानंद मानकर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली

बॉक्स

सीसीटी फुटेज तपासणी, पावसाचा व्यत्यय

शहरात सायंकाळी 5 वाजता नंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे घटनेच्या तपासात मारेकरी कोण याचा शोध घेण्यासाठी परतवाडा पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली आहे आरोपी नेमके किती होते आणि हत्येचे कारण काय याचा शोध सुरू आहे या संदर्भात परतवाडा पोलीस स्टेशनला मृतक विकी पवार यांच्या परिजनों तर्फे फिर्याद दाखल करणे सुरु होते

बॉक्स

अतिरिक्त पोलिस कुमक तैनात

शहरात हत्या झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची ीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी काही वेळासाठी दुकाने बंद करून सर्वत्र धावपळ सुरू झाली होती तर घटनेचे गांभीर्य पाहता अचलपूर सर्सपुरा शिरजगाव पथ्रोट आदी पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचाऱ्यांसह दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे

कोट

छोटा बाजार परिसरातून दुचाकीने जात असताना विकी पवार याच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आली आरोपींचा शोध घेऊन तपास सुरू आहे

सदानंद मानकर

ठाणेदार परतवाडा

Web Title: Murder of municipal cleaner in return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.