मेहुण्याने केली जावयाची हत्या

By Admin | Updated: August 5, 2015 00:32 IST2015-08-05T00:32:40+5:302015-08-05T00:32:40+5:30

पत्नीचा जुना वाद व सायकल मागण्याच्या कारणावरून मेहुण्याने जावयाची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास किरणनगर क्रमांक १ मध्ये घडली.

The murder of the brother-in-law is murder | मेहुण्याने केली जावयाची हत्या

मेहुण्याने केली जावयाची हत्या

मेहुण्याने केली जावयाची हत्या
अमरावती : पत्नीचा जुना वाद व सायकल मागण्याच्या कारणावरून मेहुण्याने जावयाची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास किरणनगर क्रमांक १ मध्ये घडली. रमेश पन्नालाल सोनटक्के (५० रा. चवरेनगर) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी बंडू सूर्यभान जंगप (रा. चवरे नगर) याला अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार, किरणनगर क्रमांक १ मधील हनुमान मंंदिराजवळ राहणारा रमेश सोनटक्के यांच्या दोन पत्नी असून दुसऱ्या पत्नीपासून त्याला दोन अपत्य आहेत. मेहुणा बंडू जंगप यांची बहीण ही रमेशची पहिली पत्नी आहे. सोमवारी रमेश हा चवरेनगरातील रहिवासी मेहुणा बंडू यांच्याकडे सायकल मागण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचा बंडूचा वाद झाला होता. त्यातच दुसऱ्या पत्नीशीही काही दिवसापूर्वी बंडूचा वाद झाला होता. सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नरहरी मंगल कार्यालयासमोरील नरसम्मा कॉलेजवळ रमेश व बंडू आमनेसामने आले होते. दरम्यान, बंडूने रमेशवर काठीने हल्ला चढविला. यामध्ये रमेश गंभीर जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत रमेश पडला असल्याची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी रमेशला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)

Web Title: The murder of the brother-in-law is murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.