अंजनगाव मार्गावर हत्या, गूढ कायम
By Admin | Updated: May 24, 2014 23:11 IST2014-05-24T23:11:20+5:302014-05-24T23:11:20+5:30
कसबेगव्हाण ते साखरी मार्गावर एका शेतालगत युवकाचा मृतदेह कोळसा झालेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी आढळून आला. ही हत्या प्रेमप्रकरणातून तर झाली नाही ना! अशा चर्चांना ऊत आला आहे.

अंजनगाव मार्गावर हत्या, गूढ कायम
प्रेमप्रकरणातून खुनाचा संशय : सर्व पोलीस ठाण्यांना बिनतारी संदेश खल्लार : कसबेगव्हाण ते साखरी मार्गावर एका शेतालगत युवकाचा मृतदेह कोळसा झालेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी आढळून आला. ही हत्या प्रेमप्रकरणातून तर झाली नाही ना! अशा चर्चांना ऊत आला आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालविले आहे. परंतु मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. अंजनगाव सुर्जी मार्गावरील साखरी गावाजवळील ज्ञानेश्वर उत्तमराव काळे यांच्या शेतालगत एका २0 ते २५ वयोगटातील युवकाचा मृतदेह आढळून आला. सकाळी शेतात जाणार्या मजुरांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेंद्र हाडोळे व पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळविले. खल्लार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड व जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांना दिली. त्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. श्वान पथकालाही पाचारण केले होते. पोलिसांनी वायरलेसवर सर्व पोलीस ठाण्यांना संदेश पाठवून मृतदेहाची माहिती दिली. (वार्ताहर)