धारणीत १७ वर्षांच्या मुलाची हत्या, आठ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:25+5:30
मुख्य आरोपी संदीप परसराम दारसिंबे याच्यासह लखन कालू दारसिंबे, सूरज भैयालाल दारसिंबे, संजू कुलाराम शेलूकर, राजेंद्र राजू दारसिंबे, राकेश राजू दारसिंबे आणि दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

धारणीत १७ वर्षांच्या मुलाची हत्या, आठ अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : स्थानिक टिंगऱ्या मार्ग परिसरात राहणाºया १७ वर्षीय मुलाची किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आली. धारणी शहरात अतिरिक्त पोलीस कुमक तैनात असताना किरकोळ वादातून रविवारी रात्री ११ ते ११.३० दरम्यान ही घटना घडली.
सैयद शोएब सैयद सईद (१७, रा. टिंगºया रोड) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री त्याचा मित्र संदीप परसराम झारेकर ऊर्फ दारसिंबे याच्याशी किरकोळ वाद झाला होता. संदीपने त्याचा वचपा काढण्यासाठी कुटुंबासह सै. शोएबचे घर गाठले. तेथे लोखंडी रॉडने शोएबवर संदीपने हल्ला केला. डोक्यावर जबर मार लागल्याने शोएबचा काही वेळातच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार लहुजी मोहंडुले, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे हे घटनास्थळी पोहोचले.
मुख्य आरोपी संदीप परसराम दारसिंबे याच्यासह लखन कालू दारसिंबे, सूरज भैयालाल दारसिंबे, संजू कुलाराम शेलूकर, राजेंद्र राजू दारसिंबे, राकेश राजू दारसिंबे आणि दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
धारणी पोलीस ठाण्यावर एक दिवसापूर्वी झालेली दगडफेक व पाठोपाठ झालेल्या हत्येमुळे शहर हादरले आहे. स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच पोलीस ठाण्यात संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी जाणून घेतली.
मृत मुलगा व आरोपी याच्यात चांगले संबंध असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली. हत्येचे कारण तपासात निष्पन्न होईल. आरोपींना अटक करण्यात आली आहे.
- श्याम घुगे
अपर पोलीस अधीक्षक