शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मनपाची दुमजली इमारत अतिक्रमितांच्या घशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 23:05 IST

राजापेठस्थित काठियावाड श्रीराम मंदिर परिसरात महापालिकेची सुस्थितीत असलेली दुमजली इमारत आहे. शाळा बंद झाल्यानंतर तेथे खासगी जिम उभारण्यात आला. तो जिम नंतर बंद पडला. कुण्या एका महिलेनेदेखील तेथील एक मजला ताब्यात घेतला होता. त्या अतिक्रमणाला एका तत्कालीन नगरसेवकाने बळ दिले होते.  वर्षांपूर्वी बाजार परवाना विभागाचे कार्यालय तेथे आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षित धोरणामुळे महापालिकेची राजापेठस्थित दुमजली इमारत अतिक्रमितांच्या घशात गेली आहे. ती बेवारस झाली आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील या इमारतीत काही वर्षांपूर्वी शाळा चालविली जात होती. मात्र, पाच ते सहा वर्षांपासून काही अनोळखी लोकांनी तेथे घुसखोरी केली आहे. त्या इमारतीच्या तळमजल्यावरील दोन ते तीन खोल्यांमध्ये काहींनी अनधिकृतपणे राहणे सुरू केले आहे.  मात्र, महापालिका प्रशासनाने मूग गिळले आहे. संबंधित अधिकारी त्या अतिक्रमणांपासून ते अनभिज्ञ असल्याचा दावा करून नामानिराळे झाले आहेत. राजापेठस्थित काठियावाड श्रीराम मंदिर परिसरात महापालिकेची सुस्थितीत असलेली दुमजली इमारत आहे. शाळा बंद झाल्यानंतर तेथे खासगी जिम उभारण्यात आला. तो जिम नंतर बंद पडला. कुण्या एका महिलेनेदेखील तेथील एक मजला ताब्यात घेतला होता. त्या अतिक्रमणाला एका तत्कालीन नगरसेवकाने बळ दिले होते.  वर्षांपूर्वी बाजार परवाना विभागाचे कार्यालय तेथे आले. अलीकडे बाजार परवाना विभागाचे कार्यालय राजापेठ झोन कार्यालयात हलविण्यात आले. त्यामुळे ती इमारत आपल्या अखत्यारीत आहे, याचा मनपा प्रशासनाचा विसर पडला. त्यामुळे आता एका अतिक्रमणधारकाने तळमजल्यावरील संपूर्ण एक हॉल रहिवाशांसाठी ताब्यात घेतला आहे, तर मागील बाजू दुसऱ्या एका अनोळखी अतिक्रमणधारकाच्या कवेत अडकली आहे. इमारतीत तूर्तास केवळ एक आधार अपडेट केंद्र तेवढे सुरू आहे. तेथील अतिक्रमणधारकच त्या इमारतीचे भक्षणकर्ते ठरले आहेत

असामाजिक तत्त्वांचा वावरही इमारत प्रशासनाने अतिक्रमणधारकांना आंदणात दिल्याने तेथे रात्रीच्या वेळी असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. तेथे कुणीही हटकणारा नसल्याने संपूर्ण इमारत बेवारस बनली आहे. दुपारी, सायंकाळी व्यवसाय केला की, तीन ते चार हातगाड्या बिनदिक्कतपणे त्या आवारात ठेवल्या जातात. ते प्रशासनाच्या गावीही नाही.

शिक्षण विभागाचे प्रमुख अनभिज्ञशिक्षण विभागाची जबाबदारी असलेल्या सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, ते त्या इमारतीबाबतच अनभिज्ञ होते. मात्र, शिक्षण विभागाकडून माहिती घेतो, सोमवारी प्रत्यक्ष पाहणीदेखील करतो, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आवारात अनधिकृत पार्किंग महापालिकेच्या या विस्तीर्ण इमारतीला भलेमोठे आवार आहे, तर सकाळपासून सायंकाळपर्यंत तेथे बाजूच्या संकुलात शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक दुचाकी लावल्या जातात. लगतच्या संकुलात येणाऱ्यांसाठी महापालिका इमारतीचे ते आवार हक्काचे पार्किंगस्थळ ठरले आहे. संकुलाशी संबंधित एक व्यक्ती दररोज सकाळी वाहने त्या इमारतीच्या आवारात लावण्याच्या सूचना देताना दृष्टीस पडतो.

जोपर्यंत त्या इमारतीत शाळा होती, तोपर्यंत विभागाचे लक्ष होते. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून तेथे शाळा भरविली जात नाही. त्यामुळे तेथे कोण राहतो, कुणी अतिक्रमण केले की कसे, याबाबत माहिती नाही. वस्तुस्थिती जाणून घेण्यात येईल. - अब्दुल राजीक, प्रभारी शिक्षणाधिकारी, महापालिका.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण