नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी हातात घेतल्या काठ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:09+5:30
सोबतच अनेक नागरिकांना तंबीसुद्धा देण्यात आली. मास्क न घालणाऱ्यांपासून रुपये दोनशे प्रमाणे दंडदेखील वसूल करण्यात आले. देवडी - टक्कर चौक या प्रमुख रस्त्यावर अचलपूर नगरपालिका कार्यालयासमोरील भागात पोलीस, होमगार्ड सोबतच अचलपूर नगरपालिकेचे कर्मचारी हातात काठी घेऊन रस्त्यावर उभे होते. नगर पालिकेचे कर्मचारी पहिल्यांदाच हातात दंडे घेऊन उभे असताना दिसताच सगळ्यांना आश्चर्यच वाटले.

नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी हातात घेतल्या काठ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : अचलपूर नगरपालिका हद्दीत मास्क न लावता विविध ठिकठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांवर पालिका कर्मचाऱ्यांद्वारा दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोबतच अनेक नागरिकांना तंबीसुद्धा देण्यात आली. मास्क न घालणाऱ्यांपासून रुपये दोनशे प्रमाणे दंडदेखील वसूल करण्यात आले.
देवडी - टक्कर चौक या प्रमुख रस्त्यावर अचलपूर नगरपालिका कार्यालयासमोरील भागात पोलीस, होमगार्ड सोबतच अचलपूर नगरपालिकेचे कर्मचारी हातात काठी घेऊन रस्त्यावर उभे होते. नगर पालिकेचे कर्मचारी पहिल्यांदाच हातात दंडे घेऊन उभे असताना दिसताच सगळ्यांना आश्चर्यच वाटले.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पालिका कर्मचाऱ्यांनी देवडी मार्गावरून येणारे तसेच टक्कर, परतवाडा येथून जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. तोंडावर मास्क न लावणाऱ्या दुचाकीस्वार व पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला. अनेकांना व्यवस्थित मास्क लावण्याबाबत सांगण्यात आले. मास्क नसेल तर तोंडावर कापडी रुमाल, बांधण्याचे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई नगरपालिकेचे कर्मचारी इकबाल, रामा निपाणे, अमोल चतारे, सुनील गायकवाड, दिलीप लेंधे यांनी केली.