रेन हॉर्वेस्टिंगसाठी नगरपरिषद, महापालिकेला सक्तीचे आदेश
By Admin | Updated: June 20, 2016 00:03 IST2016-06-20T00:03:13+5:302016-06-20T00:03:13+5:30
पावसाच्या पाणी संचयाचे आवाहन करीत जनतेला विविध उपययोजना करायला लावणाऱ्या राज्य सरकारच्या आवाहनाला शासकीय विभागाकडून प्रतिसाद नसल्याचे पुढे आले आहे.

रेन हॉर्वेस्टिंगसाठी नगरपरिषद, महापालिकेला सक्तीचे आदेश
सूचना : पावसाचे पाणी बचतीसाठी उपाययोजना
अमरावती : पावसाच्या पाणी संचयाचे आवाहन करीत जनतेला विविध उपययोजना करायला लावणाऱ्या राज्य सरकारच्या आवाहनाला शासकीय विभागाकडून प्रतिसाद नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून शासकीय इमारतींमध्येही या उपाययोजना असाव्यात, असा आग्रह करणाऱ्याला शासनालाच पुन्हा एकदा याचे गांभीर्य लक्षात घेता आदेश काढावा लागला आहे.
नगरविकास विभागाकडून नव्याने काढलेल्या आदेशानुसार नगरपरिषद, महापालिकांच्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या उपाययोजना करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश सर्व महापालिकांना पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यभरातून अलीकडच्या काही वर्षांत निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता या संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने अनेक पावले उचलली होती. यामध्ये पावसाळ्यात छतावरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा संचय करून त्याद्वारे विहिरी किंवा कृत्रिम टाक्याची निर्मिती करून त्यात पाणी साठवून ठेवण्याला प्राधान्य देण्यात येऊ लागला. ऐन वॉटर हार्वेस्टिंगमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होेते. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता राज्य सरकारने यासंदर्भात शासनाच्या विविध विभागांनाही यांच्या इमारतीमध्ये उपापयोजना कराव्यात, अशा सूचना २००७ मध्येच केल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे एकीकडे शासनाच्या विभागाद्वारेच रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात दुर्लक्ष करण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र महापालिका हद्दीत नव्याने निर्माण होत असलेल्या इमारतींमध्ये या उपाययोजना करण्याची सक्ती केली नाही. या उपाययोजना न करणाऱ्या इमारतींचा नकाशाच मंजूर न करण्याची कार्यवाहीची तरतूदही यात करण्यात आली आहे. दरम्यान असे असले तरी नगरपालिका व महापालिकांच्या काही इमारतीतच या उपाययोजनांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे नगरविकास विभागाने आता नगरपरिषदेच्या आणि महापालिकेच्या इमारतीकडे या इमारतीची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)