शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

महापालिकेत सभागृह नेत्यावर संक्रांत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

सर्वांना समान न्याय नाही, असा विद्यमान सभागृहनेता सुनील काळे यांच्यावर काही नगरसेवकांचा आक्षेप आहे व तो त्यांनी पक्षश्रेष्ठी, पदाधिकाऱ्यांसमोर सक्षमपणे मांडल्याची माहिती आहे. सध्या भाजपक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ डिसेंबरला शहराध्यक्षपदाची निवड होती; ती आता ३० डिसेंबरला होणार आहे.

ठळक मुद्देबदलाचे वारे जोरात : डिसेंबरच्या आमसभेत नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेत महापौर व उपमहापौर बदलल्यानंतर आता सभागृहनेता बदलाचे वारे जोराने वाहू लागले आहे. नगरसेवकांत धूमसत असलेला असंतोष व त्यावर भाजपनेत्यांची ठोस भूमिका पाहता, या महिन्याच्या महासभेत नव्या सभागृहनेत्याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.सर्वांना समान न्याय नाही, असा विद्यमान सभागृहनेता सुनील काळे यांच्यावर काही नगरसेवकांचा आक्षेप आहे व तो त्यांनी पक्षश्रेष्ठी, पदाधिकाऱ्यांसमोर सक्षमपणे मांडल्याची माहिती आहे. सध्या भाजपक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ डिसेंबरला शहराध्यक्षपदाची निवड होती; ती आता ३० डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, सभागृहनेता बदलावरून पक्षामध्ये घमासान सुरू झाले आहे.तसे पाहता महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीच्या वेळीच सभागृहनेत्याच्या महापालिकेतील भूमिकेला अनेक सदस्यांनी उघडपणे विरोध दर्शवून पक्षनेतृत्वाकडे कैफियत मांडली होती. महापौर व उपमहापौरांप्रमाणेच यांचाही कार्यकाळ संपवा व पक्षाच्या निष्ठावान सदस्याला सभागृहनेत्याची संधी द्या, अशी मागणी त्याचवेळी जोरकसपणे पुढे आली. या पदासाठी इच्छुकांनी दावेदारीदेखील केली आहे. यापूर्वी महापौरपदासाठी इच्छुक असलेले सचिन रासने, चंद्रकांत बोमरे यांच्यासह तुषार भारतीय यांची नावे सभागृहनेतेपदासाठी चर्च्चेत आहेत.मुळात माजी महापौर संजय नरवणे, विद्यमान सभागृहनेता सुनील काळे हे मूळ भाजपचे नाहीत. ते प्रवेशित पदाधिकारी आहेत. त्यांनाच संधी दिली जाते, असा काही नगरसेवकांचा खुला आरोप आहे. असाच आरोप संध्या टिकले यांच्यावरही होत आहे. त्यांनी मध्यंतरी जगदीश गुप्ता यांच्या गटाची कास धरली होती. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय केव्हा, अशी विचारणा भाजपश्रेष्ठींना होत आहे. आता महापालिकेत भाजपक्षाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच न्याय मिळावा, या मागणीने आता उचल खाल्ली आहे.महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपक्षाद्वारे याच नीतीचा अवलंब केला गेला. आता इच्छुकांपैकी एकाला सभागृहनेता केले जाऊ शकते व याची घोषणा याच महिन्याच्या आमसभेत केली जाऊ शकते, अशी विश्वसनीय माहिती आहे.सभागृहनेत्यावर हा आक्षेपसर्व सदस्यांना समान निधीचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्यांना निधी मिळाला नाही, ते सर्व नगरसेवक नाराज आहेत. निधीचे वाटप निकटस्थ सदस्यांनाच करण्यात आले व यामध्ये कमालीची गुप्तता पाळली गेली. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. महापालिकेत काही सदस्यांनाच झुकते माप दिले जाते. यासह अनेक आक्षेप सदस्यांनी पदाधिकाऱ्यांसमक्ष मांडले आहेत. त्यामुळे आता नवा सभागृहनेता निवडीची दाट शक्यता आहे.पक्षश्रेष्ठींद्वारे 'डॅमेज कंट्रोल'महापालिकेतील काही कामांत कंत्राटदारासह भागीदारीने काही सदस्यांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. अशीच स्थिती उद्यानांच्या कामातदेखील आहे. तेथेही काहींची भागीदारीच असल्याचा आरोप आहे. याची आता उघड चर्चा शहरात सुरू असल्याने पक्षाची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. हे सर्व कारनामे पक्षश्रेष्ठींच्या पुढ्यात मांडल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे या कंत्राटदार सदस्यांवर नेतृत्वाची खपामर्जी झाल्याने 'डॅमेज कंड्रोल' केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.आयुक्तांकडे होणार नोंद !महापालिकेच्या सभागृहात भाजपचे सर्वाधिक ४५ सदस्य आहेत. या पक्षाचे गटनेता सुनील काळे आहेत. त्यांच्यासह युवा स्वाभिमानचे तीन व रिपाइंचा एक अशा ४९ सदस्यांच्या गटाची स्वतंत्र नोंदणी ही विभागीय आयुक्तांकडे आहे. त्यामुळे सभागृहात भाजपक्षाचे संख्याबळ हे सर्वाधिक असल्याने या पक्षाचा गटनेता हा सभागृहनेता म्हणून ओळखला जातो व त्यांना काही विशेषाधिकारदेखील असतात.अशी आहे प्रक्रियाभाजपचे शहाराध्यक्षांकडून गटनेता बदलासह नव्या गटनेत्याच्या नावाचे पत्र हे महापालिकेच्या नगरसचिवांना प्राप्त होते. त्यानंतर हे पत्र नगरसचिवांद्वारे नोंदणीसाठी विभागीय आयुक्तांकडे सादर केले जाते. त्यानंतर या नावाची रीतसर घोषणा सभापती आमसभेत करतात, अशी माहिती आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका