स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेची स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: October 29, 2014 22:43 IST2014-10-29T22:43:12+5:302014-10-29T22:43:12+5:30
‘स्वच्छ भारत अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्याच्या उद्देशाने महानगपालिकेच्यावतीने बुधवारी जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेची स्वच्छता मोहीम
अमरावती : ‘स्वच्छ भारत अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्याच्या उद्देशाने महानगपालिकेच्यावतीने बुधवारी जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली.
विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापौर चरणजितकौर नंदा, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, मनपा आयुक्त अरुण डोंगरे, विरोधी पक्षनेता दिगंबर डहाके यांनी मोहिमेत भाग घेतला. वसंत टॉकीज, बालाजी मंदिर परिसरातही यावेळी साफसफाई करण्यात आली. आयुक्त अरुण डोंगरे यांनी सर्व नागरिकांना या अभियानात सहभागी होऊन मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.‘स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती’ ही संकल्पना राबविण्यासाठी अमरावतीकर जनतेचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. नागरिकांनी कचरा कंटेरनमध्येच टाकला तर अमरावती शहरातील स्वच्छतेची समस्या काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे. महापौर चरणजितकौर नंदा यांनी या अभियानाला शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने या मोहिमेबद्दल सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली.