मुंबईच्या दाम्पत्याने अमरावतीत चोरलेले सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:15 IST2021-04-28T04:15:11+5:302021-04-28T04:15:11+5:30
बडनेरा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या एक जोडपे घरमालकाला गंडा घालून पसार झाले. पोलिसांनी ...

मुंबईच्या दाम्पत्याने अमरावतीत चोरलेले सोने जप्त
बडनेरा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या एक जोडपे घरमालकाला गंडा घालून पसार झाले. पोलिसांनी पुणे येथून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी ४७ ग्रॅम सोने चोरल्याची कबुली कोठडीत दिली होती. एका व्यापाऱ्याकडून हा ऐवज जप्त करण्यात आला. सोन्याची किंमत १ लाख ६० हजार रुपये एवढी आहे.
मुंबई येथील भांडुप निवासी नवनीत नाईक व त्याची पत्नी साईनगर परिसरात घरमालकाकडे चोरी करून पसार झाले होते. त्यांना बडनेरा पोलिसांनी पुणे येथून अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान ४७ ग्रॅम सोने चोरल्याची कबुली त्यांनी दिली. बडनेरा पोलिसांनी सदरचे सोने जप्त केले. या दोघा पती-पत्नीची २७ एप्रिल रोजी कस्टडी संपली. यामुळे दोघांनाही न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी सहायक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे डीबी स्कॉडच्या चमूने या दोघा आरोपींना पुणे येथून अटक केली. या जोडप्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घरमालकांना गंडा घातल्याची बाबदेखील समोर आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.