शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तागिरीचा ‘तो’ व्हिडिओ बनावट, दरड कोसळल्याची केवळ अफवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 20:08 IST

जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी येथे कोसळणा-या महाकाय धबधब्याला प्रचंड पूर येऊन महाकाय दरड कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मात्र, येथे असला कोणताही प्रकार घडला नसून गुरूवारी हजारो भाविकांनी श्रीक्षेत्र मुक्तागिरीला भेट दिली.

परतवाडा (अमरावती), दि.14 - जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी येथे कोसळणा-या महाकाय धबधब्याला प्रचंड पूर येऊन महाकाय दरड कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मात्र, येथे असला कोणताही प्रकार घडला नसून गुरूवारी हजारो भाविकांनी श्रीक्षेत्र मुक्तागिरीला भेट दिली. त्यामुळे दरड कोसळल्याची केवळ अफवा असून पर्यटकांसह जैनबांधवांनी अशा बदनामीकारक व्हायरल व्हिडीओवर विश्वास ठेवू नये, असे प्रबंधकांनी स्पष्ट केले आहे. जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी हे परतवाडा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यांतर्गत येणारे  मुक्तागिरी (मेंढागिरी) चारही बाजूने उंच पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. वर्षभर येथे जैन बांधवांसह इतर पर्यटक लाखोंच्या संख्येने येतात. नागनदीचे पाणी, उंचावरून कोसळणारे धबधबे आणि येथील एकूण ५२ मंदिरे हे येथील वैशिष्ट्य आहे. 

खोडसाळपणाचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये येथील प्रसिद्ध धबधब्याला पूर आल्याचे व त्यातून लाल रंगाचे मातकट पाणी वाहत असल्याचे आणि त्यामुळे दरड कोसळल्याचे दाखविण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असलेला हा व्हिडीओ खोडसाळपणाचा प्रकार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आठ वर्षांपूर्वी कोसळला होता दगड !समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर असलेल्या मुक्तागिरीला उंच-उंच पहाडांनी वेढले आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी एक मोठा दगड पहाडावरून कोसळला होता. खाली कोसळताच त्याचे दोन तुकडे झाले व दोन दिशेने गेले. त्यातून अप्रिय घटना टळली, अशी माहिती मुक्तागिरी संस्थानचे प्रबंधक नेमीचंद जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मुक्तागिरी येथे दरड कोसळल्याची घटना घडलेली नाही. मंदिराचे नुकसानही झाले नाही. बदनामीकारक बनावट व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. येथे सर्व सुरळीत आहे. दोन हजारांवर जैनबांधव आणि पर्यटकांनी बुधवारपासून मुक्तागिरीला भेट दिली आहे. - नेमीचंद जैन,प्रबंधक, मुक्तागिरी

दोन ते तीन हजार लोक येथे बुधवारपासून आहेत. विविध राज्यांसह शहरातून आलो आहोत. येथे सर्व व्यवस्थित आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.- प्रमोद जैन (वसूर)बेळगाव, कर्नाटक

टॅग्स :Templeमंदिर