मूग खरेदीत शेतकऱ्यांची थट्टा
By Admin | Updated: August 30, 2016 23:59 IST2016-08-30T23:59:22+5:302016-08-30T23:59:22+5:30
यंदाच्या खरीप हंगामातील नवीन मूग बाजारात विक्रीस आला आहे.

मूग खरेदीत शेतकऱ्यांची थट्टा
वीरेंद्र जगताप : शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामातील नवीन मूग बाजारात विक्रीस आला आहे. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी मुगाचे भाव पाडून शेतकऱ्यांची थट्टा व आर्थिक पिळवणूक चालविली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा प्रकार तातडीने बंद करावा,यासाठी शासकीय मूंग खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू करावे, अशी मागणी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी याच मुद्यावर आ.वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा सहनिबंधक गौतम वालदे यांना निवेदन देऊन तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी पोळा सण महत्त्वाचा आहे. मात्र या सणाच्या तोंडावरच चांदूररेल्वे व अन्य कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावाने मूंग खरेदी करून पिळवणूक चालविली आहे. शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. यात मुगाचा दर ५ हजार २२५ रूपये प्रति क्विंटल एवढा बोनससह जाहीर केल्यानंतरही व्यापारी मात्र नवीन मुगाची खरेदी ३ हजार ९०० ते ४ हजार रूपयाप्रमाणे करीत आहेत. त्यामुळे मूग उत्पादकांचे क्ंिवटलमागे हजार ते बाराशे रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आ. वीरेंद्र जगताप, आ. बच्चू कडृू, आ. अमित झनक, रणधीर सावकर आदींनी भेट घेऊन तातडीने शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार उपसहकार मंत्री यांनी अमरावती जिल्ह्यात हमीभावापेक्षा कमी भावाने मुगाची खरेदी होत असल्यास त्वरित कारवाई करण्याचे पत्र जिल्हा निबंधक यांना पाठविले आहे. त्या पार्श्वभूमिवर आ. जगताप यांनी जिल्हा निबंधक व जिल्हा मार्के टींग अधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यात शासकीय हमीभावाने मुगाची खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
याबाबत त्यांनी निवेदनसुध्दा दिले आहे. यावेळी प्रदीप वाघ, प्रभाकर वाघ, जगदीश आरेकर, दिलीप तरोणे व शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सध्या बाजारात मूग ओला येत आहे. त्यासोबतच शासनाने खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सुचना दिलेल्या नाहीत. मात्र खरेदी केंद्र सुरू करण्याचे दुष्ट्रीने मार्केटींग फेडरेशन मार्फत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. आदेश मिळताच हमी भावाने मूगाची खरेदी केली जाईल
अशोक देशमुख
जिल्हा मार्केटींग अधिकारी
अमरावती.