चिखलदऱ्यात स्वच्छता मोहिमेला जल्लोषात सुरुवात

By Admin | Updated: February 3, 2016 00:15 IST2016-02-03T00:15:47+5:302016-02-03T00:15:47+5:30

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत साकारण्यासाठी २ आॅक्टोबर २०१४ पासून देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.

The muddy cleanliness campaign begins with the celebration | चिखलदऱ्यात स्वच्छता मोहिमेला जल्लोषात सुरुवात

चिखलदऱ्यात स्वच्छता मोहिमेला जल्लोषात सुरुवात

स्वच्छ भारत अभियान : नागरिकांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला परिसर, उत्स्फूर्त प्रतिसाद
चिखलदरा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत साकारण्यासाठी २ आॅक्टोबर २०१४ पासून देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून २५ सप्टेंबर २०१५ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत सूचित करण्यात आल्यानुसार चिखलदरा नगरपरिषदेने सदर अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.
चिखलदरा नगरपरिषदेची सन २०११ चे जनगणनेनुसार लोकसंख्या ५१५८ असून ९४८ कुटुंब आहेत. चिखलदरा शहर हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक बांधकामाकरिता या नगरपरिषदेस २२६ शौचालयाचे उद्दिष्ट देण्यात आले असून प्रति शौचालय १२००० रुपये एवढे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे अनुदान व नगरपरिषदेने १४ व्या वित्त आयोगामधून ५००० रुपये असे १७००० रुपये अनुदान लाभार्थ्यांना मंजूर केले आहे. चिखलदरा नगरपरिषदेकडे प्राप्त २५० अर्जांपैकी पात्र २२६ लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले.
चिखलदरा शहरातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय हा मजुरीचा आहे. बहुतेक भाग हा आदिवासी बहुल नागरिकांचा आहे. बांधकामाकरिता लागणारे साहित्य परतवाडा, आसेगाव येथून आणावे लागते. त्यामुळे अनुदानाचा पहिला हप्ता वाटपानंतर फक्त शौचालयाचे बांधकाम सुरू झाल्याचे निदर्शनास आले. अशावेळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांची वेगवेगळी तुकडी बनवून शहरातील प्रत्येक भागात नियुक्त करून लाभार्थ्यांच्या घरोघरी भेटी दिल्या गेल्या. त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. त्यांना बांधकामाचे साहित्य मिळण्याकरिता स्थानिक बांधकाम साहित्य पुरवठादार, गवंडी कामे करणारे व्यक्ती यांची अध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलावून त्यांना सदर कामे पूर्ण करण्याकरिता विनंती केल्या गेली.
ज्या लाभार्थ्यांनी या उपक्रमाबाबत अनुदान घेऊन उदासीनता दर्शविली त्यांना फौजदारी कार्यवाही करण्याची सूचना देऊन त्यांचेकडून सुद्धा कामास सुरुवात करून घेण्यात आली. दररोज सकाळ व संध्याकाळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांसोबत शहरात भेटी देऊन लाभार्थ्यांच्या घरी शौचालय बांधकामाची तपासणी केल्या गेली.
चिखलदरा नगरपरिषदेला ३० डिसेंबरपर्यंत शहर हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट होते परंतु वेळोवेळी आलेल्या अडचणींमुळे मुदतीच्या आत उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. परंतु सदर शौचालय बांधकामाकरिता आम्ही अथक प्रयत्न करून २२ जानेवारीपर्यंत २२६ शौचालयांपैकी ११७ शौचालये बांधून पूर्ण करू शकलो व उर्वरीत शौचालये बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आणली. शहरात ११ सार्वजनिक शौचालये आहेत ज्यामध्ळे पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र व्यवस्था आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The muddy cleanliness campaign begins with the celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.