सिमेंट रस्त्यासाठी मातीमिश्रीत रेती

By Admin | Updated: December 10, 2015 00:23 IST2015-12-10T00:23:43+5:302015-12-10T00:23:43+5:30

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर देवस्थानचा सिमेंट रस्ता निर्माणाधिन असून या रस्त्यामध्ये नदीकाठच्या मातीमिश्रीत रेतीचा सर्रास वापर होत आहे.

Mtimisheit sand for the cement road | सिमेंट रस्त्यासाठी मातीमिश्रीत रेती

सिमेंट रस्त्यासाठी मातीमिश्रीत रेती

नांदगाव पेठ विकासमंचचा आरोप : सिमेंटचा नाममात्र वापर
नांदगाव पेठ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर देवस्थानचा सिमेंट रस्ता निर्माणाधिन असून या रस्त्यामध्ये नदीकाठच्या मातीमिश्रीत रेतीचा सर्रास वापर होत आहे. सिमेंटचा मात्र नाममात्र वापर होत असल्याने या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोेप नांदगाव पेठ विकास मंचने केला आहे.
पर्यटन विकास अंतर्गत आमदार निधीमधून सात लक्ष रूपये या रस्त्यासाठी मंजूर झाले आहेत. सहा महिन्यांपासून रस्त्याच्या निर्मितीचे थातूरमातूर काम होत आहे. सद्यस्थित रस्त्याचे कार्य अंतिम टप्प्यात आले असून यासाठी नदीकाठची मातीमिश्रीत रेती वापरण्यात येत आहे.
आतापर्यंत सिमेंटचा मात्र नाममात्र वापर करण्यात आला. कंत्राटदार व अधिकारी मनमानी करीत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. इस्टीमेट बनवताना सर्व साहित्य उत्तम दर्जाचे वापरण्याचा नियम असताना निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरुन रस्त्याची निर्मिती सुरू आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी आजपर्यंत या रस्ता बांधकामाला एकदाही भेट दिली नाही. त्यामुळे अधिकारी व कंत्राटदार यांची मिलीभगत तर नाही ना? अशी चर्चा परिसरात आहे. या रस्त्यात झालेल्या गैरव्यवहाराची व भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नांदगाव पेठ विकासमंचने केली आहे. (वार्ताहर)

सात लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्यामध्ये कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी मलई लाटली असून बांधकाम विभागाने या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अन्यथा याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करू.
- सत्यजितसिंह राठोड
अध्यक्ष, नांदगाव पेठ विकास मंच.

Web Title: Mtimisheit sand for the cement road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.