महावितरणने केला १,८६५ ग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:13 IST2021-03-14T04:13:33+5:302021-03-14T04:13:33+5:30
अमरावती : जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारितील ८६ हजार ४६१ ग्राहकांनी एक रुपयांचे वीजबिल न ...

महावितरणने केला १,८६५ ग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित
अमरावती : जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारितील ८६ हजार ४६१ ग्राहकांनी एक रुपयांचे वीजबिल न भरता ७० कोटी रुपये थकविले आहे. महावितरणने आतापर्यंत केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील १८६५ ग्राहकांवर २ कोटी ८७ लक्ष ५९ हजार रुपयाच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कारवाई तीव्र केली असताना १२ मार्च रोजी जवाहर गेट साबणपुरा येथे काही स्थानिकांनी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर,अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना वीज ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, विरोधाला न जुमानता महावितरण १,८६५ वीजग्राहकांचा पुरवठा खंडित केला. थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाईची मोहीम सुरू ठेवण्याचे आदेश मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी दिले आहे. या मोहिमेत शनिवारी १७ थकबाकीदारांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. वीजग्राहकांना सेवा देण्यास महावितरण बांधील आहे. पण, महावितरणची आर्थिक अडचण बघता ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे.