मृग विहार...:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:12 IST2018-04-20T22:11:53+5:302018-04-20T22:12:12+5:30
सध्या तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचले आहे. वन्यप्राणी, पक्षी यांच्या जीवाची लाही-लाही होत आहे. वनातील नैसर्गिक नाले, पाणवठे आटत चालले आहेत.

मृग विहार...:
सध्या तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचले आहे. वन्यप्राणी, पक्षी यांच्या जीवाची लाही-लाही होत आहे. वनातील नैसर्गिक नाले, पाणवठे आटत चालले आहेत. अमरावती वनविभागाच्या परिक्षेत्रामध्ये वडाळी वनविभागाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले असून, त्यात तीन दिवसाआड टँकरने पाणी पुरविले जात आहे. मोजक्या ठिकाणीच तलावात पाणी शिल्लक आहे. तेथे एकत्रित आलेले हे कळप आपली तृष्णा भागवितानाचा हा क्षण. तथापि, हा असा कळप पाहण्यासाठी रानावनांचा धांडोळा घ्यावा लागतो. (मनीष तसरे)