एमपीएससी अभियांत्रिकी सेवा-२०२१; सृजन अघम राज्यातून प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2023 17:40 IST2023-05-03T17:40:15+5:302023-05-03T17:40:49+5:30
Amravati News महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा-२०२१ परीक्षेमध्ये अंजनगाव सुर्जी येथील सृजन हा गुणवत्ता यादीत तिसाव्या क्रमांकावर असून, अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांकावर आला आहे.

एमपीएससी अभियांत्रिकी सेवा-२०२१; सृजन अघम राज्यातून प्रथम
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा-२०२१ परीक्षेमध्ये अंजनगाव सुर्जी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एन. जी. अघम यांचा मुलगा सृजन हा गुणवत्ता यादीत तिसाव्या क्रमांकावर असून, अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांकावर आला आहे.
त्याला जलसंपदा विभागात सहायक कार्यकारी अभियंता (वर्ग १) या पदावर नियुक्ती मिळाली असून, यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या अभियांत्रिकी सेवेमध्ये तो यशस्वी झाला. त्याची सहायक अभियंता (श्रेणी - २) पदी नियुक्ती होऊन जिगाव प्रकल्प अंतर्गत शेगाव येथे तो कार्यरत आहे.