शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

खासदारांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी, काही महिलांनी शाई फेकून राजापेठ उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर भादंविचे ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, १०९, १२० ब, ४२७, ५००, ५०१ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देराजापेठ पोलीस ठाण्यात बॅरिकेडिंग आरोपींना भेटता येणार नसल्याचे केले स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरण, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकारण तापले आहे. शनिवारी अमरावतीत पोहोचलेल्या खासदार नवनीत राणा यांनी या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, आयुक्तांनी प्रकृतीच्या कारणास्तव खासदारांची भेट नाकारली. त्यामुळे आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या खासदारांना शासकीय बंगल्यावरून आल्यापावली परतावे लागले. यामुळे खासदारांचा ‘डॅमेज कंट्रोल’ची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी, काही महिलांनी शाई फेकून राजापेठ उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर भादंविचे ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, १०९, १२० ब, ४२७, ५००, ५०१ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. परंतु, या प्रकरणावरून जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. खासदार, आमदार राणा दाम्पत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्यामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर हे असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, शनिवारी खासदार राणांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन अटकेतील आरोपींची भेट घेण्याचा मानस व्यक्त केला. मात्र आरोपींना भेटता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.

२.२० मिनिटांनी तूतू-मैमै...

दुपारी २.१५ वाजता खासदार राणा राजापेठ ठाण्यात पोहोचल्या. पाठीराख्यांना बॅरिकेडजवळ थांबविण्यात आले. सर्वांना आत येऊ द्यावे, यासाठी खासदार आग्रही होत्या. त्यामुळे खासदार व राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अखेर खासदार नवनीत राणा यांच्यासोबत खासगी सचिव विनोद गुहे, माजी नगरसेविका सुमती ढोके व ज्योती सैरिसे यांनी राजापेठ ठाण्यात बसलेल्या डीसीपी विक्रम साळी यांची भेट घेतली.

एसीपी पाटील-खासदारांमध्ये चकमक

शाईफेक व जीवघेणा हल्लाप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या विनोद येवतीकर याला डायलिसीससाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. खासदार राणा शनिवारी दुपारी त्यांची भेट घेण्यासाठी सुपरला पोहोचल्या. मात्र, तेथे पोलिसांच्या निगराणीत व कोठडी ठोठावलेल्या आरोपीला भेटता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे तेथे सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील व खासदारांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. 

आयुक्तांसोबत झालेली घटना दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आयुक्त आष्टीकर व त्यांच्या पत्नी यांना भेटून सांत्वन करायचे होते. आयुक्तांना मात्र राजकारण करायचे आहे. ते काही राजकीय लोकांना भेटतात आणि खासदारांची भेट नाकारतात, हे अनाकलनीय आहे. - नवनीत राणा, खासदार

छोटेखानी बैठकीतून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवलेखासदार नवनीत राणा या शनिवारी अमरावतीत पोहोचल्यानंतर त्यांनी ‘गंगा-सावित्री’ निवासस्थानावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी छोटेखानी बैठकीत युवा स्वाभिमानचे मोजकेच पदाधिकारी, नगरसेवक, महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. खासदार नवनीत राणांनी जोशपूर्ण विचार मांडले. अशी कितीही संकटे आली तरी राणा दाम्पत्य माघार घेणार नाही. आमदार रवि राणा यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याप्रकरणी कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी संजय हिंगासपुरे, जयवंत देशमुख, शैलेंद्र कस्तुरे, आशिष गावंडे, विनोद गुहे, सुमती ढोके, ज्योती सैरीसे, गणेशदास गायकवाड, अजय जयस्वाल आदी उपस्थित होते.

पुतळा त्याच जागी बसविणारराजापेठ उड्डाणपुलावर त्याच जागी रितसर परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणार, असा निर्धार खासदार नवनीत राणा यांनी केला. परवानगीसाठी अर्ज सादर केले असतानाही महापालिका आयुक्तांनी पुतळा हटविण्यासाठी घाई केली. आता परवानगी घेऊन त्याच जागी पुतळा बसवून शिवप्रेमींची मागणी पूर्ण करू, असे खासदार म्हणाल्या. 

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा