युवा स्वाभिमानतर्फे खासदार सावंत यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST2021-03-25T04:14:37+5:302021-03-25T04:14:37+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कारवाईची मागणी अमरावती : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी येथील महिला खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये ...

MP Sawant's protest on behalf of Yuva Swabhiman | युवा स्वाभिमानतर्फे खासदार सावंत यांचा निषेध

युवा स्वाभिमानतर्फे खासदार सावंत यांचा निषेध

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कारवाईची मागणी

अमरावती : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी येथील महिला खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकू व महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी धमकी देऊन अपमान केल्याचा आरोप करीत सावंत यांच्या या कृतीचा युवा स्वाभिमानने बुधवारी जाहीर निषेध केला. यावेळी युवा स्वाभिमानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्दभट्टी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. यावेळी सुमती ढोके,ज्योती सैरीसे, सपना ठाकूर, मयुरी कावरे, मीनल डकरे, रश्मी घुले, जया तेलखडे, समीक्षा गोटफोडे, अश्र्विनी झोड, शालीनी देवरे, चंदा लांडे, सुनीता कोळमकर, मीरा कोलटेके, वंदना जामनेकर, अल्का इंगोले, लता अंबुलकर, संगीता काळबांडे, अरुणा चचाणे, मीना आगासे, माला खुरसुडे, शोभा किटके, लता अंबुलकर, प्रतिभा महाजन, सुनीता सावरकर, रोशनी खेडकर, शर्मिला मिश्रा, रेखा संभे, रईसा परवीन, मोहिनी चव्हाण, रोशनी लिचाईवाले, कल्पना बनकर, वैशाली चव्हाण, सारिका अवघडे, माया माहूलकर, अर्चना तालन आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: MP Sawant's protest on behalf of Yuva Swabhiman