महाराष्ट्रात एमपी पासिंग 'नॉट अलाऊड'
By Admin | Updated: October 21, 2015 00:28 IST2015-10-21T00:28:40+5:302015-10-21T00:28:40+5:30
निवडणूक आयोगाने जात पडताळणी समितीची अट लादल्यामुळे अनेकांना निवडणूक रिंंगणात नामनिर्देशन अर्जसुध्दा दाखल करण्यापासून वंचित ठेवण्यात आले.

महाराष्ट्रात एमपी पासिंग 'नॉट अलाऊड'
नगरपंचायत निवडणूक : अनेकांची निराशा
श्यामकांत पाण्डेय धारणी
निवडणूक आयोगाने जात पडताळणी समितीची अट लादल्यामुळे अनेकांना निवडणूक रिंंगणात नामनिर्देशन अर्जसुध्दा दाखल करण्यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे अनेकांचे स्वप्नभंग झाल्याचा प्रकार नगर पंचायत निवडणुकीत पाहावयास मिळाला. तालुक्याच्या अवघ्या १५ किमीवर मध्य प्रदेश सीमा आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपुर, खंडवा, बैतुल, भैसदेही अशी महत्त्वाची शहरे तापी नदीपलीकडे वसली आहेत.
महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेक हिंदी भाषकांची सोयरिक मध्यप्रदेशात झाली आहे. त्यांचे महाराष्ट्रात ग्रामपंचायत नगर पंचायतीत त्यांच्या पतीसोबत लग्नानंतरचे नावही जोडले गेले असून त्यांचे मतदार यादीत, रेशन कार्डात व इतर सर्व शासकीय दस्ताऐवजात नाव नोंदणी झाल्याने येथील सर्व नियम व कायदे त्यांना आपसुकच लागू झाले. मात्र, निवडणूक प्रक्रियेत राखीव जागेसाठी महिला प्रवर्गातील ओबीसी, एसटी, एससी, एनटी यांना उमेदवारी अर्ज भरताना सोबत जात पडताळणी समितीचे प्रमाणपत्र किंवा दाखल प्रकरणाची द्यावयाची अट आवश्यक केली आहे. परंतु अशा अर्जांचा जात पडताळणी समितीने अस्विकार केल्याने इच्छुकांचे निवडणुकीचे स्वप्न भंगले आहे. मध्यप्रदेशातील रहिवाशांची जात पडताळणीचा अधिकारच नसल्याचे कारण पुढे त्यांना परत पाठविल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.