विविध मागण्यांकडे वेधले लक्ष; सीईओंना निवेदन
अमरावती : जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सेवारत अंशकालीन महिला परिचरांना किमान वेतन, कोविड भत्ता गणवेश व ओळखपत्र देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन सीईओंना देण्यात आले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महिला परिचरांना किमान वेतन द्यावे, शासकीय सेवेत कायम करावे, जादा कामाचा मोबदला देण्यात यावा, दरवर्षी गणवेश व भाऊबीज देण्यात यावी, मासिक मानधन दर महिन्याच्या ५ तारखेला देण्यात यावे, चादरी बेडशिट, पडदे धुलाई भत्ता देण्यात यावा, कार्यक्षेत्रात फिरता प्रवास भत्ता देण्यात यावा, कोविड लसीकरणाला पेशंटची नोंदणी करणे ५ ते ६ वाजेपर्यंत सिस्टर सहकार्य करणे या सर्व विषयावर न्याय द्यावा, अशी मागणी महासंघाच्या जिल्हाध्यक्षा गुंफा सिडाम, अलका मेश्राम, पुष्पा सराटे, अर्चना लोखंडे, रूपाली घासले, सिंधू पांडे, मीरा कुऱ्हाडकर, कुसूम पाटमासे, सुनीता खडसे, सुनीता पानबुडे, बेबी मनोहरे बेबी पाटील आदीचा समावेश होता.