झेडपीसमोर महिला परिचर महासंघाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST2021-07-27T04:14:20+5:302021-07-27T04:14:20+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सेवारत अंशकालीन महिला परिचरांना किमान वेतन, कोविड भत्ता गणवेश व ओळखपत्र ...

झेडपीसमोर महिला परिचर महासंघाचे आंदोलन
अमरावती : जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सेवारत अंशकालीन महिला परिचरांना किमान वेतन, कोविड भत्ता गणवेश व ओळखपत्र देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन सीईओंना देण्यात आले. जिल्हाध्यक्ष गुंफा सिडाम, अलका मेश्राम, पुष्पा सराटे, अर्चना लोखंडे, रूपाली घासले, सिंधू पांडे, मीरा कुऱ्हाडकर, कुसूम पाटमासे, सुनीता खडसे, सुनीता पानबुडे, बेबी मनोहरे बेबी पाटील आदी सहभागी झाल्या.
----------------
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
अमरावती : तीन वर्षे कालावधीचा कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या २०१८-१९ च्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कृषिमंत्र्याना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी आंदोलनात विद्यार्थी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रथमेश ठाकरे व पदाधिकारी सहभागी झाले होते.
--------------अचलपूर नगरपालिकेत महिलांचा ठिया
परतवाडा (अमरावती) : माता महाकालीनगर वाॅर्ड ८ परिसरातील रहिवाशांना नगरपालिकेने रस्ते, नाल्या, घरकुल, सार्वजनिक संडास, घर टॅक्ससह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मागणीकरिता तेथील महिलांनी सोमवारी अचलपूर नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणीही तेथील महिलांनी केली. नगरपालिका प्रशासनाकडून लेखी घेतल्याशिवाय मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षा समोरून उठायचे नाही. असा निर्णयच त्यांनी जाहीर केला. यादरम्यान पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. अखेर प्रशासनाने त्यांचे निवेदन स्वीकारले व त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना लिखित दिले.