युकाँचे तहसील कार्यालयात धरणे आंदोलन

By Admin | Updated: August 7, 2015 00:32 IST2015-08-07T00:32:17+5:302015-08-07T00:32:17+5:30

भाजपा सरकारने काँग्रेसच्या २५ खासदारांना जनतेच्या प्रश्नांवर मुद्दे मांडत असताना निलंबित करण्यात आले.

The movement to take part in the Yukon Tehsil office | युकाँचे तहसील कार्यालयात धरणे आंदोलन

युकाँचे तहसील कार्यालयात धरणे आंदोलन

वरूड : भाजपा सरकारने काँग्रेसच्या २५ खासदारांना जनतेच्या प्रश्नांवर मुद्दे मांडत असताना निलंबित करण्यात आले. या निलंबनाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने दुपारी २ वाजता युवक काँग्रेसचे वर्धा लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्त्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करुन भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
काँग्रेसच्या २५ खासदारांनी जनतेच्या हिताचे प्रश्न उचलून धरले होते. परंतु जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या खासदारांवर भाजप सरकारने निलंबनाची कारवाई केली. या कारवाईचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचा तीव्र निषेध करण्यात आला. युवक काँग्रेसचे वर्धा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विक्रम ठाकरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The movement to take part in the Yukon Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.