मुलाच्या आत्महत्येनंतर मातेचाही मृत्यू

By Admin | Updated: August 26, 2015 00:05 IST2015-08-26T00:05:10+5:302015-08-26T00:05:10+5:30

लिंगा येथील दिगांबर सदाशिव कळंबे (४०) या शेतकऱ्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत चकरा मारुनही कृषी कर्जाचे पुनर्गठन झाले नाही.

Mother's death after child's suicide | मुलाच्या आत्महत्येनंतर मातेचाही मृत्यू

मुलाच्या आत्महत्येनंतर मातेचाही मृत्यू

लिंगा येथील घटना : कर्जाचा बोझा कायम
लिंगा : लिंगा येथील दिगांबर सदाशिव कळंबे (४०) या शेतकऱ्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत चकरा मारुनही कृषी कर्जाचे पुनर्गठन झाले नाही. उलट कर्जाचा डोंगर वाढल्याने त्यांनी ११ आॅगस्टला रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे त्याच्या आईने दु:ख वियोगाने व्यथित होऊन सोमवारी आपला प्राण त्यागला.
काळ्या मातीला सजविण्याकरिता तो प्रयत्नाची पराकाष्ठा करुन शेत पिकवितो. कधी भाव नसते तर कधी निसर्गाची साथ मिळत नाही. अशा परिस्थितीत जिवापाड शेतीवर प्रेम करणाऱ्याचा अखेर कर्जाच्या ओझ्यापायी शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग निवडावा लागतो.
यातच कुटुंबाचा उदरनिवाह कसा करावा, सावकार, बँकांचा तगादा असल्याने कर्जाचा भरणा होऊ शकत नाही. या प्रश्नांना उत्तर मिळत नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे प्रकार घडलेत. परंतु लिंगा येथील शेतकरी दिगांबर सदाशिव कळंबे या ४० यांना मध्यवर्ती बॅकेने कर्जाचे पुनर्गठन नाकारले. यामुळे आता काय करावे या विवंचनेत येऊन ज्या काळया मातीने कुटुंब सावरले. त्याच शेततील विहिरीत उडी घेऊन प्राण त्याण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. परंतु पाठीमागे म्हातारी आई पार्वती, पत्नी आणि चिमुकली मुले असा परिवार आहे. लहान मुलींचा सांभाळ आणि पालणपोषण कसे होणार ही चिंता होती. मुलाच्या जाण्याला जेमतेम पंधरा दिवस होत नाही तोच पुन्हा आई पार्वती सदाशिव कळंबे (७०) यांनी आपली जीवनयात्रा संपविली. कळंबे परिवारावर दु:खाचे सावट पसरले आहे. (वार्ताहर)

Web Title: Mother's death after child's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.