शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आईने किडनी दान करून वाचविले मुलाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:24 PM

आईने स्वत:ची किडनी देऊन मुलाचे प्राण वाचविले. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी (विभागीय संदर्भ सेवा) रुग्णालयात ही पाचवी यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली. या शस्त्रक्रियेमुळे परतवाडा येथील सुमित राजुलाल नंदवंशी(१७) याला जीवनदान मिळाले

ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी : पाचवे प्रत्यारोपण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आईने स्वत:ची किडनी देऊन मुलाचे प्राण वाचविले. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी (विभागीय संदर्भ सेवा) रुग्णालयात ही पाचवी यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली. या शस्त्रक्रियेमुळे परतवाडा येथील सुमित राजुलाल नंदवंशी(१७) याला जीवनदान मिळालेपरतवाडा येथील सुमितच्या किडन्या निकामी झाल्याने तो नऊ महिन्यांपासून अंथरुणाला खिळला होता. त्याला सुपर स्पेशालिटीत दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधीक्षक पदावर असलेले जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व विशेष कार्य अधिकारी डॉ.टी.बी. भिलावेकर यांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत कुटुंबीयांचे समुपदेशन केले. विविध चाचण्याअंती सुुमितची आई ममता राजूलाल नंदवंशी (३९) यांनी किडनी दान करण्यास संमती दिली. त्यानुसार शुक्रवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.नागपूर येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ संजय कोलते, भूलतज्ज्ञ निशांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सुपर स्पेशालिटीचे युरोसर्जन राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ.विशाल बाहेकर, डॉ.राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट डॉ.अविनाश चौधरी, डॉ.निखिल बडनेरकर, डॉ.विक्रम कोकाटे, डॉ. सौरभ लांडे, भूलतज्ञ राजेश कस्तुरे, डॉ. रामप्रसाद चव्हाण, डॉ. प्रणित घोनमोडे यांनी शस्त्रक्रिया केली. कायदेशीर प्रक्रियेची बाजू किडनी प्रत्यारोपण समन्वयक डॉ.सोनल चौधरी व समाजसेवा अधीक्षक नवनाथ सरवदे, सतीश बडनेरकर यांनी सांभाळली.यवतमाळ येथील राज्य प्राधिकार समितीचे अधिष्ठाता मनीष श्रीगिरीवार, समिती अध्यक्ष स्नेहल कुलकर्णी, आरोग्य उपसंचालक डॉ. आर.एस. फारुकी, डॉ.टी.एस. वारे, यवतमाळचे सीएस टी.सी.राठोड, दिनकर पाटील या समिती सदस्यांच्या मान्यतेनंतर ही शस्त्रक्रिया पार पडली. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. मीनल चव्हाण, प्रकाश येनकर यांचे सहकार्य लाभले. अधिसेविका माला सुरपाम, ओटी स्टाफ प्रतिभा अंबाडकर, नीता श्रीखंडे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडिले, ज्योती काळे, रीतू बैस, आयसीयू स्टाफ आशा गडवार, अलका मोहोड आदींनी सहकार्य केले.