'पॉझिटिव्ह' चिमुकलीसाठी मातेने पत्करला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:01 IST2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:01:09+5:30

सरस्वती कॉलनी येथील एका तीस वर्षीय महिलेच्या कुटुंबातील एकूण १४ पैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात दीड वर्षांची मुलगीही पॉझिटिव निघाली. गुरुवारी सकाळी त्यांना येथील जवाहरलाल नेहरू होमिओपॅथिक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. चिमुकलीसोबत आईदेखील आली. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दीड वर्षांच्या त्या चिमुकलीसाठी आईचे हृदय अस्वस्थ आहे.

Mother poses danger for 'positive' chimpanzee | 'पॉझिटिव्ह' चिमुकलीसाठी मातेने पत्करला धोका

'पॉझिटिव्ह' चिमुकलीसाठी मातेने पत्करला धोका

ठळक मुद्देकोरोना : एकट्या जिवाला सोडण्यास धजावेना मन, सर्वांचीच झाली 'ती' लाडकी

संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोविड क्वॉरन्टीन सेंटरला मातेसह १४ महिन्यांची चिमुकली दाखल झाली. मातेला मास्क तर चिमुकलीला काहीच नव्हते. चिमुकली एका ठिकाणी थांबत नव्हती. त्यामुळे मातेला तिला घेऊन फिरावे लागत होते. अधिक चौकशी केली असता, माता नव्हे, तर चिमुकली कोरोना संक्रमित असल्याचे कळले. एकटीला पाठविणे शक्य नसल्याने चिमुकलीची आईदेखील कोरोनाचा धोका पत्करून क्वॉरन्टीन सेंटरला दाखल झाली. अनेक मातांची अशी अवस्था कोरोनाकाळात झाली आहे.
सरस्वती कॉलनी येथील एका तीस वर्षीय महिलेच्या कुटुंबातील एकूण १४ पैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात दीड वर्षांची मुलगीही पॉझिटिव निघाली. गुरुवारी सकाळी त्यांना येथील जवाहरलाल नेहरू होमिओपॅथिक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. चिमुकलीसोबत आईदेखील आली. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दीड वर्षांच्या त्या चिमुकलीसाठी आईचे हृदय अस्वस्थ आहे.
कुटुंबातील पाचही जण याच ठिकाणी अलगीकरणात ठेवण्या आले असल्याने कोरोनाची साधी कल्पनाही नसलेली ती चिमुकली हसत-खेळत, बागडत आहे. तिचे गोड हास्य सर्वांना हवेहवेसे वाटते. ४८ तासांत तिने सर्वांना आपलेसे केले. मामा, काका, आजोबा, आजी, काकू, दीदी असे नाते नवख्या रुग्णांशी निर्माण झाले. चिमुकली आणि तिच्या आईवर ओढवलेल्या प्रसंगामुळे क्वॉरंटाईन सेंटरवर उपस्थितांचेही मन हळवे होते. ती लवकर बरी व्हावी आणि आई सुखरूप अहावी, अशी प्रार्थना सर्वजण व्यक्त करीत आहेत.

Web Title: Mother poses danger for 'positive' chimpanzee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.