टाकरखेडा संभू परिसरात तालुक्यातील सर्वाधिक पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:12 IST2021-07-26T04:12:09+5:302021-07-26T04:12:09+5:30

टाकरखेडा संभू (वार्ताहर) संतोष शेेंडे भातकुली तालुक्यात टाकरखेडा संभू, साऊर, रामा या परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

Most crop loss in the taluka in Takarkheda Sambhu area | टाकरखेडा संभू परिसरात तालुक्यातील सर्वाधिक पिकांचे नुकसान

टाकरखेडा संभू परिसरात तालुक्यातील सर्वाधिक पिकांचे नुकसान

टाकरखेडा संभू (वार्ताहर) संतोष शेेंडे

भातकुली तालुक्यात टाकरखेडा संभू, साऊर, रामा या परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील २०३५ हेक्टर पिकाखालील क्षेत्र या अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. या नुकसानाची पाहणी रविवारी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली. सर्वेक्षणानंतर तत्काळ मदत जाहीर करू, असे आश्वासनदेखील यावेळी त्यांनी दिले.

भातकुली तालुक्यात अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय दोन युवकदेखील वाहून गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. टाकरखेडा संभू, साऊर, रामा या परिसरात दोन हजार पस्तीस हेक्टरवरील जमीन पाण्याखाली आली. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टाकरखेडा संभू परिसरातील ९२० हेक्टर, साऊर परिसरात ८०५, रामा परिसरात ३१० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यापूर्वी जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या भागाची पाहणी करून सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर रविवारी राज्याचे कृषिमंत्री यांनी टाकरखेडा संभू परिसरात दाखल होऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. सर्वेक्षणानंतर लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी पवणीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंड्या, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा सदस्य जयंत देशमुख, सरपंच रश्मी देशमुख, उपसरपंच प्रदीप शेंडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप म्हसके, अविनाश तायडे,मुदस्सीर शें अताऊल्ला, सोनाली जामठे, प्रीती पाटील, शिल्पा लांडगे, गटविकास अधिकारी प्रल्हाद तेलंग, शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, सुनील खराटे, राजेश वानखडे, बाजार समितीचे उपसभापती नाना नागमोते, आशिष धर्माळे, उमेश घुरडे, हरिभाऊ मोहोड, मुकद्दर पठाण, पटवारी मनोज भेले, पोलीस पाटील अजय मोहकर, जिल्हा कृषी अधीक्षक विजय चव्हाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे, तालुका कृषी अधिकारी मुक्ता कोकाटे, मंडळ कृषी अधिकारी अशोक जाधव, निलेश जामठे आदींसह गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

250721\img-20210725-wa0099.jpg

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीची पाणी करताना कृषी मंत्री माननीय दादाजी भुसे

Web Title: Most crop loss in the taluka in Takarkheda Sambhu area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.