जिल्ह्यात बहुतांश बसस्थानकांतील हिरकणी कक्ष नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:08+5:302021-01-08T04:37:08+5:30

इंदल चव्हाण- अमरावती : जिल्ह्यातील १४ बसस्थानक आहेत. आठ आगार असून प्रत्येक आगारात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. ...

Most of the bus stands in the district have diamond room names | जिल्ह्यात बहुतांश बसस्थानकांतील हिरकणी कक्ष नावालाच

जिल्ह्यात बहुतांश बसस्थानकांतील हिरकणी कक्ष नावालाच

इंदल चव्हाण- अमरावती : जिल्ह्यातील १४ बसस्थानक आहेत. आठ आगार असून प्रत्येक आगारात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र, काही कारणास्तव काही कक्ष बंदच आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान स्तनदा मातांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये बसच्या प्रतीक्षेत बसताना प्रवासी महिलेची तान्हुल्या बाळाला दूध पाजताना कुचंबणा होऊ नये याकरिता सात वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळातर्फे हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली. मात्र, सद्यस्थितीत ठिकठिकाणी आगाराचे नूतणीकरण होत असल्याने ते कक्ष नामशेष झाल्याचे दिसून येत आहे. अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातील हिरकणी कक्ष सर्व सोयीने युक्त आहे. मात्र, काही मातांना याची माहिती नसल्याने त्याचा उपयोग फार कमी मातांना होत असल्याची माहिती आहे.

बॉक्स

हिरकणी कक्ष तयार कण्याचा हेतू

नजीकच्या प्रवासात बाळांना दूध पाजण्याची वेळ येत नसली तरी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या मातांना आपल्या तान्हुल्याला अधिक वेळ उपाशी ठेवता येणार नाही. तो भुकेने व्याकूळ रडू नये, यासाठी सार्वजनिक ठिकाणी बाळाला दूध पाजताना मातेला लज्जा निर्माण होऊ नये, बाळाला नि:संकोच दूध पाजता यावे, या हेतूने प्रत्येक बसस्थानकात स्तनदा मातांच्या सोयीसाठी हिरकरणी कक्ष स्थापन करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

कोट

दुरुपयोग टाळण्यासाठी कुलूपबंद

बसस्थानकात हिरकणी कक्षात पंख्यासह प्रकाश व्यवस्था नीट केलेली आहे. त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून दार बंद ठेवण्यात येते. त्याची चावी चौकशी कक्षात ठेवण्यात आलेली आहे. अन्यथा कुणीही कक्षात शिरून गैरवापर करू करू नये, हा त्यामागील उद्देश आहे.

- शैलेश गवई, सहायक वाहतूक अधीक्ष, मध्यवर्ती बसस्थानक

-

हिरकणी कक्ष स्तनदा मातांसाठी फायद्याचे

बस स्थानकात बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या स्तनदा मातांना बाळाला पाजण्याकरिता हिरकणी कक्ष आहे, याची माहिती आहे. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे.

- अर्चना हरिदास तिखे,

प्रवासी महिला, चिखली.

Web Title: Most of the bus stands in the district have diamond room names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.