मोर्शीत दरोडा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:06+5:302021-09-21T04:15:06+5:30

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) येथील सिंभोरा रोडवरील असलेल्या पुण्यनगरी लेआउट मध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका घरी पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी ...

Morshit robbery, | मोर्शीत दरोडा,

मोर्शीत दरोडा,

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) येथील सिंभोरा रोडवरील असलेल्या पुण्यनगरी लेआउट मध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका घरी पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरातील कुटुंबीयांना तलवारीचा धाक दाखवून सिनेस्टाईल पद्धतीने घरातील सोने व नगदी रकमेसह एकूण 88 हजार 500 रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना आज दि. 20 सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार अमरावती न्यायालय येथे कार्यरत असलेले जयप्रकाश केशवराव फरतोडे यांचे स्वतःचे घर पुण्यनगरी लेआउट येथे असून त्यांच्या घरी त्यांची वयोवृद्ध आई शकुंतला केशवराव फरतोडे, पत्नी सौ. वैशाली जयप्रकाश फरतोडे, मुलगा आदेश व मुलगी श्रावणी हे रात्रीला जेवण करून झोपले असता आज दि. 20 सप्टेंबरच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी समोरील दाराची कडी तोडून घराच्या आत प्रवेश केला. सर्वप्रथम दरोडेखोरांनी जयप्रकाश यांचे हात मागे बांधून सर्व मोबाईल जवळ घेऊन त्यातील सिम काढून घेतले. त्यानंतर कुटुंबातील उर्वरित चार जणांना एका खोलीत उभे ठेवून तलवारीच्या धाकावर गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातले, अंगुठी, व 15000 नगदीसह एकूण 88 हजार 500 रुपयाचा ऐवज लंपास केला. सदर अज्ञात दरोडेखोर हिंदी मराठी बोलत असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच ठाणेदार मोहंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची एक चमू घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी घरातील पंचनामा आटोपला. या ठिकाणी अमरावती येथील शॉनपथक व ठसेतज्ञ पथक दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास आरंभिला आहे. यापूर्वी कित्येक वर्षाच्या अगोदर मोर्शी शहरात रामजीबाबा मंदिराच्या मागे राहणाऱ्या भामकर कुटुंबीयांकडे दरोडा पडला होता.

Web Title: Morshit robbery,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.