मोर्शीत शौचालय लाभार्थ्यांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: February 3, 2016 00:23 IST2016-02-03T00:23:19+5:302016-02-03T00:23:19+5:30
नगरपरिषदेत मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या बदलीची वार्ता मिळताच शौचालय लाभधारकांनी नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.

मोर्शीत शौचालय लाभार्थ्यांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव
मोर्शी : नगरपरिषदेत मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या बदलीची वार्ता मिळताच शौचालय लाभधारकांनी नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.
सर्वात प्रथम उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मुख्याधिकाऱ्यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर सर्व शौचालय लाभधारकांनी मोर्चा नगरपालिकेकडे वळविला. मोर्चाचे नेतृत्व नगरसेविका सुनीता कुमरे यांनी केले. आपण गरिबांकरिता शौचालये बांधून देण्याची योजना राबवीत होत्या. आपण मोर्शीकरिता विकासाचे कार्य करीत असताना आपली बदली झाली, आम्ही आपणास जाऊ देणार नाही, अशा गरीब महिला नगरपरिषद कार्यालयात टाहो फोडत होत्या. आम्ही सर्व महिला शासनाच्याविरोधात उपोषणाला बसू, असे महिलांनी यावेळी बोलून दाखविले.
शौचालयाचे १३१३ लाभार्थ्यांपैकी १०७२ धनादेश देण्यात आले, नवीन प्रकरणे दुसऱ्या टप्पा पुन्हा सुरू आहे. मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी गरीब-गरजू व्यक्तींना शौचालयाची योजना वॉर्डात जाऊन प्रकरणे दाखल करण्यास प्रवृत्त करीत होत्या. राजकारणाला बळी पडू मॅडमची बदली झाल्याचे बोलल्या जाते. यावेळी नगरसेविका श्रीमती सुनीता कुमरे, दयाल रतन मसराम, मंगेश पेठे, अब्दुल अनिस अ. युनूस, माजी नगरसेवक सुलतानशहा गुलजारशहा, दिनेश श्यामलाल पंदरे व शेकडो महिला-पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)