मोर्शीत अल्पशिक्षित, सुशिक्षितही मैदानात

By Admin | Updated: October 3, 2014 01:04 IST2014-10-03T01:04:53+5:302014-10-03T01:04:53+5:30

विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याकरिता उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेची अट घातली नसल्यामुळे इयत्ता सातवीपासून ....

In Morshi, a well-educated, educated field | मोर्शीत अल्पशिक्षित, सुशिक्षितही मैदानात

मोर्शीत अल्पशिक्षित, सुशिक्षितही मैदानात

रोहितप्रसाद तिवारी  मोर्शी
विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याकरिता उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेची अट घातली नसल्यामुळे इयत्ता सातवीपासून चक्क वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवार विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. मतदार उच्च विद्याविभूषीत उमेदवाराला पसंती देतात की, अल्पशिक्षित उमेदवाराला निवडतात, हे निवडणूक निकालानंतरच कळणार आहे.
मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता एकूण २८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. एका उमेदवारांचे नामांकन रद्दबातल करण्यात आले. तर ८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.
इयत्ता ७ ते १० वी अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची संख्या दोन आहे. त्यात सुमित्रा गायकवाड (अपक्ष) या इयत्ता ७ वी उत्तीर्ण आहेत, तर नरेशचंद्र ठाकरे (काँग्रेस) हे इयत्ता ८ वी उत्तीर्ण आहेत. इयत्ता १० वी ते १२ वी अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता धारण करणारे ३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात विनायक वाघमारे (हिंदुस्थान जनता पार्टी) १२ वी नापास, अरुण चव्हाण (भारिप बहुजन महासंघ) आणि चंद्रकांत कुमरे (अपक्ष) हे दोन्ही उमेदवार १० वी उत्तीर्ण आहेत. १२ वी उत्तीर्ण ते पदवी परीक्षा अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता धारण करणारे ५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात संजय देशमुख (मनसे) बी.ए प्रथम वर्ष, कैलास वानखडे (भारतीय दलित काँग्रेस) बी.ए. व्दितीय वर्ष अनुत्तीर्ण, विजय कोकाटे (अपक्ष)-बी.ए. व्दितीय वर्ष उत्तीर्ण, सुरेंद्र अघम (आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी) आणि अनिल खांडेकर (प्रहार) हे दोघेही इयत्ता बारावी उत्तीर्ण आहेत.
पदवीधारक ३ उमेदवारांमध्ये महेंद्र भातकुले (बहुजन मुक्तीपार्टी)-बी.ए., सुनीता कुमरे (अपक्ष)-बी.कॉम, प्रदीप चोपडे (अपक्ष), बी. कॉम. यांचा समावेश आहे. विधी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांची संख्या ३ आहे. त्यात हर्षवर्धन देशमुख (राकाँ)-बीए., एलएलबी., उमेश यावलकर (शिवसेना) एलएलबी., आशिष वानखडे (अपक्ष)-एलएलबी यांचा समावेश आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांची संख्या केवळ २ आहे. त्यात अनिल बोंडे (भाजपा), वसंत लुंगे (अपक्ष) हे दोघेही उमेदवार एमबीबीएस, (एमडी) शैक्षणिक अर्हताधारक आहेत. याशिवाय मृदुला श्रीकांत पाटील (बसपा) या एम.ए (फिलॉसॉफी) आणि पश्चिम बंगाल शासन मान्य डीएचएमएस ही परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय दलित काँग्रेसचे उमेदवार कैलास कचरु वानखडे यांच्याविरुध्द ६, संजय देशमुख मनसे यांच्याविरुध्द २ तर प्रहारचे अनिल खांडेकर यांच्याविरुध्द १ फौजदारी प्रकरण दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. या चार उमेदवारांशिवाय इतर एकाही उमेदवारांवर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. शैक्षणिक अर्हतेपेक्षा जनतेच्या समस्या निवारण करणाऱ्या उमेदवाराला मतदार प्राधान्य देतील, हे निश्चित. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: In Morshi, a well-educated, educated field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.