३५ हजार क्विंटलपेक्षा अधिक मका, ज्वारी खरेदीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:42+5:302021-01-08T04:36:42+5:30

फोटो - ०६ एस जावरे आदिवासींच्या घरासह गोदामा पुढे पडून, आदिवासी महामंडळाची खरेदी बंद, पालकमंत्री, आमदारांनी घेतली दानवे, भुजबळ ...

More than 35,000 quintals of maize, sorghum awaiting purchase | ३५ हजार क्विंटलपेक्षा अधिक मका, ज्वारी खरेदीच्या प्रतीक्षेत

३५ हजार क्विंटलपेक्षा अधिक मका, ज्वारी खरेदीच्या प्रतीक्षेत

फोटो - ०६ एस जावरे

आदिवासींच्या घरासह गोदामा पुढे पडून, आदिवासी महामंडळाची खरेदी बंद, पालकमंत्री, आमदारांनी घेतली दानवे, भुजबळ यांची भेट

नरेंद्र जावरे : परतवाडा - धारणी व चिखलदरा तालुक्‍यांमध्ये आदिवासी विकास महामंडळामार्फत मका आणि ज्वारी खरेदी अचानक बंद करण्यात आल्याने ३५ हजार क्विंटलपेक्षा अधिक ट्रॅक्टरमध्ये भरून आणलेले आदिवासींचे धान्य खरेदी केंद्रापुढे मागील आठवड्यापासून पडून आहे. यादरम्यान ही खरेदी तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मंगळवारी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन तात्काळ खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

मेळघाटात शासनाद्वारे मका व ज्वारीची शासकीय खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आदिवासी शेतकऱ्यांनी शासकीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसुद्धा केली. शासकीय खरेदीचे टारगेट पूर्ण झाल्याचे सांगून खरेदी प्रक्रिया अचानक बंद करण्यात आली. नवीन उद्दिष्ट आणि मान्यता केंद्र शासनाकडून मिळाल्यानंतर खरेदी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना दिली. त्यावरून मंगळवारी पालकमंत्री यशोमती ठाकूर व आ. पटेल यांनी ना. रावसाहेब दानवे यांची घेतली आणि तात्काळ खरेदीची मागणी केली. यावेळी राज्य शासनाच्यावतीने मागील खरेदीचा अहवाल न पाठविल्याने केंद्र शासनाने खरेदी थांबविल्याचे उघड झाले.

बॉक्स

भुजबळांना दिले निवेदन

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन केंद्रीय मंत्र्यांनी पुढे केलेल्या कारणाबाबत त्यांना सांगितले गेले. याशिवाय पालकमंत्री ठाकूर व आ. पटेल यांनी खरेदी प्रक्रिया चालू होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

बॉक्स

उपमुख्यमंत्र्यांनी दिले ज्वारी खरेदीचे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आ. पटेल यांनी मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. त्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विकास पाटील यांना तात्काळ ज्वारी खरेदीचे आदेश त्यांनी दिले. केंद्राकडून मका खरेदीची परवानगी येताच तेसुद्धा खरेदी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

कोट

मुंबई येथे मंगळवारी केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांची मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यासह भेट घेऊन मेळघाटातील मका व ज्वारी खरेदीसंदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

- यशोमती ठाकूर, पालकमंत्री अमरावती

Web Title: More than 35,000 quintals of maize, sorghum awaiting purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.