रिद्धपूरवासीयांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST2021-12-06T05:00:00+5:302021-12-06T05:00:54+5:30
ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा धडकला. याप्रसंगी नायब तहसीलदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्त ढोमणे उपस्थित होते. सरपंच गोपाल जामठे, ग्रामविकास अधिकारी डेरे यांनी मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. जमा मशीद ट्रस्टची जागा निर्णयाप्रमाणे मिळावी, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.

रिद्धपूरवासीयांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
रिद्धपूर : नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात रिपाइं व एमआयएम यांनी ग्रामपंचायतवर शनिवारी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व ॲड. दीपक सरदार यांनी केले.
मोर्चाची सुरुवात काजीपुरा मशीद येथून शांततेच्या मार्गाने करण्यात आली. सम्राट चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून वानखडेपुरा मार्गे ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा धडकला. याप्रसंगी नायब तहसीलदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्त ढोमणे उपस्थित होते. सरपंच गोपाल जामठे, ग्रामविकास अधिकारी डेरे यांनी मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. जमा मशीद ट्रस्टची जागा निर्णयाप्रमाणे मिळावी, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. रिपाइंचे चंदू थोरात, राजकुमार सरवटकर, उमेश वानखडे, एमआयएम रिद्धपूर शाखाध्यक्ष शेख फैजल, हाजी निसार, शफीक कैसरखाँ, अब्दुल आहाद, नईम पठाण, सुशील वानखडे व ग्रामस्थ उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पांडे यांच्या मार्गदर्शनात शिरखेडचे ठाणेदार विक्रांत पाटील, वरूड येथील ठाणेदार केशव ठाकरे यांनी बंदोबस्त ठेवला.