बारसमोरून मोपेड वाहन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:13 IST2021-09-27T04:13:35+5:302021-09-27T04:13:35+5:30

विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकले वरूड : तालुक्यातील सुरळी येथील ३१ वर्षीय विवाहितेला माहेरहून एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावत ...

Moped vehicle lamps in front of the bar | बारसमोरून मोपेड वाहन लंपास

बारसमोरून मोपेड वाहन लंपास

विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकले

वरूड : तालुक्यातील सुरळी येथील ३१ वर्षीय विवाहितेला माहेरहून एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावत मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर तिच्या अंगावर रॉकेल टाकले. दरम्यान पळून जाताना वीट फेकून मारल्याने त्या जखमी झाल्या. ही घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आरोपी गजानन रामदास बहुरूपी (३२), रामदास संपत बहुरूपी (६०) व एक महिला (५५, सर्व रा. सुरळी)विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

दवाखान्यात जाणाऱ्या मुलीला घरी घेऊन गेला

अचलपूर : आईसोबत दवाखान्यात जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात थांबवून दुचाकीवर बस, नाहीतर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करेन, अशी धकमी देत दुचाकीवर बसविले. थेट त्याच्या घरी नेले. माझ्याशी लग्न करते की नाही, अशी विचारणा करीत घरीत बसवून ठेवल्याची तक्रार मुलीने अचलपूर पोलिसांत दिली. त्यावरून २४ सप्टेंबर रोजी नितीन गंगाधर तायडे (२६, मल्हारा) विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Moped vehicle lamps in front of the bar