महिनाभरापासून तूर यार्डातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:30 IST2017-09-02T23:30:03+5:302017-09-02T23:30:18+5:30

हमी भावानुसार तूर खरेदीचे टोकन दिल्यानंतरही वाढीव मुदतीत तूर खरेदी केली नाही, असा आरोप करीत शेतकºयांनी तत्काळ तूर खरेदी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

For a month, fall in Tur Yard | महिनाभरापासून तूर यार्डातच पडून

महिनाभरापासून तूर यार्डातच पडून

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांकडे तक्रार : टोकन असूनही मोजणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : हमी भावानुसार तूर खरेदीचे टोकन दिल्यानंतरही वाढीव मुदतीत तूर खरेदी केली नाही, असा आरोप करीत शेतकºयांनी तत्काळ तूर खरेदी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. शासनाने शेतकºयांच्या जीवाशी खेळ चालविला असल्याचा आरोप यावेळी शेतकºयांनी केला.
५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला गेला. परंतु शेतकºयांना ३१ आॅगस्टपर्यंतचे टोकण देऊनसुद्धा अद्यापही तुरीचे मोजमाप केले नाही. टोकणधारकांना २८ जुलैला दुरध्वनीवर माहिती देऊन तुमच्या मालाच्या मोजमापाकरिता नंबर लागला आहे. २९ जुलैला तूर बाजार समितीत घेऊन यावे, असे सांगण्यात आले. २९ जुलैला आणलेले तुरीचे पोते अद्याप मोजण्यात आले नाहीत. तुमच्या तुरी आम्ही मोजू शकत नाही. ३१ जुलैला मोजून घेऊ असे सांगण्यात आले. बाजार समितीत पडून असलेल्या तुरीची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न शेतकºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनातून विचारला आहे. आर्थिक चणचणीमुळे एखाद्या शेतकºयाने आत्महत्या किंवा तूर चोरी अथवा भुंगा लागल्यास नुकसानाची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद आहे. यासंदर्भातील एक निवेदन राजेंद्र केदार, रमेश पंडागळे, प्रमिला माकोडे, अनिता मांजरे, अशोक नेरकर, परिक्षीत वानखडे, वालजी भाई पटेल, जेसराज पटेल, एम.जे.पटेल, माधव पटेल यांनी केली आहे.

Web Title: For a month, fall in Tur Yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.