शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्यामुळे ‘मान्सून सूचक’ धोक्यात..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 18:09 IST

मृग नक्षत्राचा संकेत अर्थात मान्सूनची नांदी देणारे गोसावी व इतर कीटकांचे आयुष्य पावसाअभावी धोक्यात आले आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

ठळक मुद्देमृग नक्षत्राचा संकेत अर्थात मान्सूनची नांदी देणारे गोसावी व इतर कीटकांचे आयुष्य पावसाअभावी धोक्यात आले आहे.मुख्य ‘मृगाचा काळा कीडा’ व ‘गोसावी’ यंदा दृष्टीस पडला नाही. दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने जंगलातील जैवविविधता धोक्यात आली आहे.

अमरावती - मृग नक्षत्राचा संकेत अर्थात मान्सूनची नांदी देणारे गोसावी व इतर कीटकांचे आयुष्य पावसाअभावी धोक्यात आले आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मुख्य ‘मृगाचा काळा कीडा’ व ‘गोसावी’ यंदा दृष्टीस पडला नाही. त्याचवेळी गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने जंगलातील जैवविविधता धोक्यात आली आहे.

मृगाची सुरुवात होताच ग्रामीण भागात ‘काळा कीडा’ दिसतो. त्यावरून मृगाच्या पावसाचे संकेत शेतकऱ्यांना मिळतात. अवकाळी पाऊस व मृगाचा पाऊस यातील फरक या कीटकसृष्टीच्या अस्तित्वातून सहज लक्षात येतो. मृगाच्या पहिल्या पावसानंतर ओल्या मातीवर चालणारा, भगव्या रंगाचा अन् धोक्याचा स्पर्श होताच पाय मिटवून चेंडूसारखा गोल करून बसणारा मखमली ‘रेड वेल्वेट माईट’ यंदा दृष्टीस पडला नाही. ग्रामीण भागात त्याला ‘गोसावी’ किंवा ‘साधू’ नावानेही ओळखले जाते. विशेषत: विदर्भात त्याला ‘राणी ‘कीडा’ देखील म्हटले जाते. पावसाळ्यात ओल्या मातीवर चालणारा हा कीटक त्यानंतर केवळ चार महिने दिसतो आणि नंतर सुप्तावस्थेत जातो.

कृषी-परिस्थितीमध्ये वाढते रसायन व औषधामुळे अनेक सूक्ष्मजीव व कीटकांचे जीवन धोक्यात सापडले आहे. काही वर्षात शेतीत रासायनिक खाते व कीटकनाशके यांचा वाढता वापर यांच्या जीवावर बेतत आहे. पहिल्या पावसानंतर शेती व जंगल परिसरात गोसावी आढळून येतो. हा कीटक अतिशय संवेदनशील असून धोक्याचा स्पर्श होताच एकदम निर्जीव होऊन शांत बसतो. जणू काही मेलाच की काय, असे भासवतो. कुजलेल्या पानाचे बारीक कण व लहान सूक्ष्मजीव याचे मुख्य खाद्य आहे. याचे आयुष्य अवघे चार महिन्यांचे असते. पावसाळी हंगामापुरते आपले अस्तित्व असणारे हे कीटक दिवसेंदिवस कमी होत आहेत. शेतीसाठी किंवा कोणत्याही पिकासाठी हा धोकादायक नसून, हा पूर्णत: निरूपद्रवी आहे. काही वर्षांत याची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. 

निसर्ग अन्नसाखळी असुरक्षित

परिसंस्थेतील अन्नजाळ्यात कीटक अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कीटक हे पक्षी, साप, सरडे यांचे मुख्य खाद्य आहेत. अन्नसाखळी समृद्ध असेल तरच जैवविविधता समृद्ध राहते. रसायने व वाढता कीटकनाशकांचा वापर जैवविविधतेसाठी जीवघेणा ठरला असल्याची बाब अमरावती येथील वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पाऊस लांबला की सूक्ष्मजीवांचे संवर्धन होत नाही. पिकांसोबत मैत्रीचे नाते सूक्ष्मजीवांचे असून, ते कमी होत असल्याने पिकांची वाठ खुंटते. हवामानाच्या आद्रतेवरीही परिणाम होतो. पावसाळात भूतलावर येणारे सूक्ष्मजीव हे शेतकऱ्यांचे मित्र असतात.

- एन. व्ही. फिरके, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र अमरावती विद्यापीठ

 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस