११ वेळा मान्सूनची हुलकावणी
By Admin | Updated: May 23, 2015 00:44 IST2015-05-23T00:44:23+5:302015-05-23T00:44:23+5:30
खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना मान्सूनची चिंता लागली आहे.

११ वेळा मान्सूनची हुलकावणी
४४ वर्षांत आगमनातील विविधता : यंदा १० जूननंतर पावसाची शक्यता
गजानन मोहोड अमरावती
खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना मान्सूनची चिंता लागली आहे. मागील वर्षाचा खरीप हंगाम मान्सूनच्या उशिरा येण्यामुळे उद्ध्वस्त झाला होता. गत ४४ वर्षांचा आढावा घेतला असता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळून आली. तब्बल ११ वेळा मान्सूनचे उशिरा आगमन झाले आहे. २००२ मधील २७ जुलैला मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा १० जूननंतर मान्सूनचे होणारे आगमन शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या अखेर साधारणपणे मान्सूनची सुरुवात होते. गत ४४ वर्षांत सर्वात अगोेदर ५ जून १९९० मध्ये मान्सून आला होता. यंदा मृग नक्षत्राची सुरुवात ही ८ जूनला होत आहे. या नक्षत्रात पाऊस पडतो. किंबहुना पावसाची सुरुवातच मृग नक्षत्रात होते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. या अनुषंगाने खरीप पेरणीचे नियोजन केले जाते. यावर्षी २५ मे नंतर दोन दिवस पूर्वमान्सून व १० जुलै नंतर मान्सून जिल्ह्यात सक्रिय होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
यंदाच्या खरिपासाठी कृषी विभागाचे अनुमान
पावसाला वेळेवर सुरुवात पण खंड पडण्याची शक्यता.
खरीप पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशा ओलाव्याच्या अभावाची शक्यता.
विभागात सरासरी एवढ्या पावसाची शक्यता कमी.
जून, जुलैमध्ये, पिण्याचे व सिंचानाचे पाणी तसेच वैरण टंचाईची शक्यता
कडधान्याची वेळेवर पेरणी करण्यात अडचणी संभवतात.
खरिपासाठी हे नियोजन आवश्यक.
मूलस्थानी जलसंधारण, संरक्षित सिंचन, आंतरपीक आवश्यक.
हलक्या, मध्यम जमिनीत कपाशीऐवजी ज्वारी, सोयाबीन, मका, तूर पिके घ्यावीत.
चारा पीक उत्पादन कार्यक्रम राबविण्याची गरज.
पूर्व मान्सूनचा पाऊस २४ व २५ मे रोजी येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १० जूननंतर मान्सून सक्रिय होईल, अशी शक्यता आहे.
- अनिल बंड, हवामान तज्ज्ञ,