१४ जूनपर्यंत मान्सूनचे विदर्भात आगमन
By Admin | Updated: May 15, 2016 00:05 IST2016-05-15T00:05:13+5:302016-05-15T00:05:13+5:30
यंदा १४ जूनपर्यंत विदर्भात मान्सून पोहोचण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.

१४ जूनपर्यंत मान्सूनचे विदर्भात आगमन
हवामान तज्ज्ञांचा अंदाज : शनिवारपर्यंत पावसाची शक्यता
वैभव बाबरेकर अमरावती
यंदा १४ जूनपर्यंत विदर्भात मान्सून पोहोचण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. दुष्काळग्रस्त स्थितीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही सुखद बातमी आहे. त्यातच शनिवारपर्यंत पुन्हा विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदानानुसार, यंदा २८ किंवा ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असून १० ते १२ जूनदरम्यान महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यंदा उन्हाळा चांगला तापणार असल्याचे भाकित हवामान तज्ज्ञाने दिले होते. त्यानुसार तापमानाने उच्चांकाकडे वाटचाल करून ४५ डिग्री सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. मात्र, दरम्यान अवकाळी पावसाने तापमान पुन्हा खाली उतरले. आता आणखी तापमान हळुहळू वाढू लागले आहे. अनिल बंड यांच्या मते नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वारे ठळक कमी दाबाचे श्रेत्रात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. परिणामी पूर्व मान्सून सिझनचे पहिले चक्रीवादळ चेन्नई किनारा व आंध्र प्रदेश ओरिसामध्ये येत्या २ ते चार दिवसात मुसळधार वादळी पावसाची शक्यता आहे. हे वादळ मान्सूनला बळ देणार असून मान्सून वेळेपूर्वी येण्याची शक्यता आहे. विदर्भ ते तामिळनाडू खंडीत वारे असल्यामुळे शनिवारपर्यंत विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. दरम्यान, ३९ ते ४१ डिग्रीपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यातच गुरुवारी पुन्हा पावसाची शक्यता आहे. साधारणत: मे व जूनचा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्यातील शेवटच्या दिवसात सूर्य आग ओकणार अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसात वापसाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या असह्य उकाड्याने आता नागरिक हैराण होत आहे.
शनिवारपर्यंत पावसाची शक्यता असून त्यानंतर तापमान हळूहळू वाढणार आहे. २ ते ३ डिग्रीने तापमान वाढून ४४ डिग्री पार करणार आहे. तसेच यंदा १४ जूनपर्यंत मान्सून विदर्भात धडकणार असल्याची शक्यता आहे.
- अनिल बंड, हवामान तज्ज्ञ