शुक्रवारपर्यंत विजेच्या गडगडाटासह हलका पाऊस१५ जूननंतर मान्सून : हवामानतज्ज्ञांचा अंदाज
By Admin | Updated: May 31, 2016 00:04 IST2016-05-31T00:04:06+5:302016-05-31T00:04:06+5:30
मध्यमहाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

शुक्रवारपर्यंत विजेच्या गडगडाटासह हलका पाऊस१५ जूननंतर मान्सून : हवामानतज्ज्ञांचा अंदाज
अमरावती : मध्यमहाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. १५ जूननंतर विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार, विदर्भात कोठेही मुसळधार वादळी पावसाची शक्यता सद्यस्थितीत नाही. येत्या ४८ तासांत तापमानात विशेष बदल होणार नाही. हवामानतज्ज्ञांनुसार पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, झारखंडमार्गे पश्चिम बंगालवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. उत्तर मध्यप्रदेश, बिहार, आसाम व मेघालयच्या ९०० मीटरवर तर लक्षद्विपच्या ६ ते ७ किमीवर चक्राकार वारे वाहात आहेत. त्यामुळे विदर्भात मान्सूनचे आगमन १५ जूननंतर होण्याची शक्यता आहे. यामुळे ३ जूनपर्यंत विदर्भात काही ठिकाणी विजेच्या गडगटासह हलका पाऊस पडू शकतो.
शहरात पावसाचा शिडकावा
सोमवारी शहरात काही ठिकाणी पाच मिनिटे पावसाचा शिडकाव झाला. त्यामुळे थोडा का होईना उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला होता. (प्रतिनिधी)