मनरेगातील शौचालयाचे अनुदान वितरण बंद
By Admin | Updated: November 11, 2014 22:32 IST2014-11-11T22:32:38+5:302014-11-11T22:32:38+5:30
केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी आता १२ हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे.

मनरेगातील शौचालयाचे अनुदान वितरण बंद
अमरावती : केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी आता १२ हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. स्वच्छ भारत मिशनच्या २ आॅक्टोबर २०१४ पासून योजनेचा लाभ मिळणार आहे.
केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्ळा निर्मल भारत अभियानचे २ आॅक्टोबर रोजी स्वच्छ भारत मिशन असे नामकरण करण्यात आले. निर्मल भारत अभियानातून वैयक्तिक शौचालयाने बांधकाम करण्यासाठी ४६०० रूपयांचे अनुदान देण्यात येत होते. तसेच या लाभार्थ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ४५०० असे एकूण ९१०० रूपयांचे अनुदान मिळत होते. त्याऐवजी आता स्वच्छ भारत मिशन म्हणून १२ हजार रूपये देण्यात येणार आहेत. यातील ९ हजार रूपये (७५ टक्के) केंद्र शासन तर ३ हजार रूपये (२५ टक्के) राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे तर मनरेगातून दिले जाणारे प्रोत्साहन अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमधील शौचालयांच्या बांधकामासाठी स्वतंत्रपणे अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे. तोपर्यंत स्वच्छ भारत मिशनमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीसाठी दोन लाख रूपये देण्यात येणार असून त्यातील १ लाख २० हजार रूपये केंद्र शासन ६० टक्के ६० हजार रूपये, राज्य शासन ३० टक्के देणार असून २० हजर रूपये १० टक्के लोकवर्गणीतून जमा करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)