वानरराजाची तृष्णातृप्ती...

By Admin | Updated: February 6, 2016 00:16 IST2016-02-06T00:16:57+5:302016-02-06T00:16:57+5:30

पाणी म्हणजे अमृत..सगळ्यात जीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज भासते.

Monarchy of the monarchy ... | वानरराजाची तृष्णातृप्ती...

वानरराजाची तृष्णातृप्ती...

वानरराजाची तृष्णातृप्ती... पाणी म्हणजे अमृत..सगळ्यात जीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज भासते. पण, सिमेंटच्या जंगलात भरकटलेल्या या तहानलेल्या माकडाला पाणी पाजणार तरी कोण? आणि त्याची व्याकूळता समजून घ्यायला वेळ तरी कुणाकडे? पण, विभागीय क्रीडा संकुलाच्या मार्केटसमोरील पायऱ्यांवर बसलेल्या या दिनवाण्या माकडाची पाण्यासाठी चाललेली धडपड एका सहृदय, वन्यप्रेमी नागरिकाने हेरली. त्याने चक्क त्या वानरराजासाठी बिस्किटचे पाकिट तर खरेदी केलेच पण बाटलीतून पाणी आणून त्या वानराला पाजले. त्याची ही माणुसकी त्या ‘माकडा’ पर्यंत पोहोचली आणि ते निर्धास्तपणे असे पाणी प्यायले.

Web Title: Monarchy of the monarchy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.