शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आई, माफ कर, ‘आद्या’ला खूप शिकव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:01 IST

धारणी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पती धारणी येथे रुजू होत असल्याने पत्नी किरण या रविवारी दुपारी मुलगी व सासऱ्यासह धारणीत पोहोचल्या. मात्र, त्यांचे कलेवर दिसताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 

ठळक मुद्देसुसाईड नोटमध्ये चुकांची कबुली

पंकज लायदेलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : ‘आई, माफ कर’ असे लिहून सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. एका छोटाशा कागदावर पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून तांबे यांनी गळफास घेतला. पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष, तडफदार व निडर अधिकारी अशी ओळख असलेल्या तांबे यांच्या या आत्मघाती निर्णयाने सारेच अचंबित व शोकविव्हळ झाले आहेत. धारणी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पती धारणी येथे रुजू होत असल्याने पत्नी किरण या रविवारी दुपारी मुलगी व सासऱ्यासह धारणीत पोहोचल्या. मात्र, त्यांचे कलेवर दिसताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिघांचाही विलाप तेथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांचा कडा पाणावून गेला. पत्नी किरणचे तर भानच हरपले. अवघ्या ३४ वर्षांच्या कर्तव्यकठोर अधिकारी मुलाचे पार्थिव पाहून रमेश तांबे शून्यात हरविले. तर अबोध आद्या आईच्या कुशीत दडली. नेमके काय झाले, अतुल यांनी आत्मघात का करून घेतला, याबाबत प्रत्येकजणाने शंका उपस्थित केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत तांबे कुटुंबीयांचे सांत्वन केले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

नोकरीत खुप चुका; आद्याला शिकव एपीआय अतुल तांबे यांनी पत्नी किरण हिच्या नावे मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात, ‘किरण, माझ्यामुळे नोकरी करताना खूप चुका झाल्या. नेहमी वाटायचे, तुला सांगावे,  पण, शक्य झाले नाही. आज टोकाचा निर्णय घेताना आई, बाबा, तुझा व आद्याचा चेहरा समोर येतोय. कदाचित मी केलेल्या चुकीची किंमत माझे आयुष्य असेल. खूप विचार केला, पण काय करावे, हे समजत नाही. आद्याला खूप शिकव. मलाच सर्व बघायचे होते, पण आता शक्य नाही. झालेच तर माफ कर. तुमची सर्वांची काळजी वाटते. शेवटच्या क्षणी काय करावे, काय लिहावे, हे कळत नाही, जय गजानन, असे चिठ्ठीत नमूद आहे.  

साखरी येथे काय घडले?पती अतुल हे या आधी धुळे जिल्ह्यातील साखरी येथे कार्यरत होते. तेथून गतवर्षी त्यांना फोन कॉल आले होते. त्यावेळी त्यांनी ते प्रकरण निपटवले होते. मात्र, ते प्रकरण नेमके काय, त्याची माहिती आम्हाला नाही. दोन दिवसांआधीदेखील त्यांना तेथील माहिती देण्याकरिता फोन आला होता. तेथीलच कामाचा काही ताण असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका किरण तांबे यांनी ठाणेदार विलास कुलकर्णी यांचेकडे व्यक्त केली. त्या दृष्टीने तपास करण्याची विनंतीदेखील त्यांनी ठाणेदारांना केली

 

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू